Tuesday, May 21, 2024
HomeदेशBus Fire: प्रवाशांनी भरलेल्या वोल्वो बसला लागली आग, दोघांचा मृत्यू, खिडकीतून उडी...

Bus Fire: प्रवाशांनी भरलेल्या वोल्वो बसला लागली आग, दोघांचा मृत्यू, खिडकीतून उडी मारत प्रवाशांनी वाचवला जीव

गुरूग्राम: दिल्लीच्या गुरूग्राम येथे एका चालत्या प्रवासी बसला आग(bus fire) लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. आग लागल्यानंतर काही लोकांनी खिडकीतून उडी मारत आपला जीव वाचवला. या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही बस गुरूग्राम येथून महोबा येथे जात होती. सुरूवातीला माहिती मिळाली होती की बसच्या खिडकीतून उडी मारत १०-१० लोकांनी आपला जीव वाचवला. दुसरीकडे सूचना मिळताच स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले. अडकलेल्या लोकांना बसमधून बाहेर काढले. दरम्यान, बस या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती.

दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवर बस क्रमांक एआर ०१ के७७०७ या बसमध्ये जेव्हा लोक प्रवासासाठी बसले तेव्हा त्यांना थोडीही कल्पना नव्हती की असे काही घडेल. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यात स्पष्ट दिसत आहे की बस आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

 

गुरूग्रामच्या माईलस्टोन बिल्डिंगजवळ दुर्घटना

आग लागल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. ही दुर्घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माईलस्टोन बिल्डिंगकडे घडली. वॉल्वो टूरिस्ट बसमधून अनेकदा प्रवासी प्रवा करत असतात यात अनेक स्लीप बसेसही असतात.

 

परिस्थिती नियंत्रणात

गुरूग्राम पोलिसांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हायवे ४८, गुरुग्राममध्ये गुगल कंपनीजवळ एक बसमध्ये आग लागल्याची सूचना मिळताच श्री विकास अरोडा आयपीएस पोलीस आयुक्त गुरूग्रामसहित गुरूग्राम पोलीस अधिकारी, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -