इंधनानंतर भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

Share

विजय मांडे

कर्जत : इंधनाच्या दरांनी शंभरी पार केली आहे. त्यातच भर म्हणून सर्वसामान्य तथा श्रीमंतांना लागणारी रोजची आवश्यक गोष्ट म्हणजे भाजीपाला. या भाजीपाल्याचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा हताश सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.

कोरोना महामारीमुळे दीड ते दोन वर्षे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली तर, अनेकांचे व्यवसाय-धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली असून घरगुती गॅस हजारी गाठण्याच्या स्थितीत आहे. इंधनाच्या भाववाढीचा भडका उडाला आहे. त्यातच आता रोजच्या जीवनात लागणाऱ्या भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाला आहे.

भाजीपाल्याचे दर वाढल्याने मटार- २०० रुपये किलो, फ्लॉवर – ८० रुपये किलो, कोबी – ४० रुपये किलो, टमाटर – ६० रुपये किलो, घेवडा – ७० रुपये किलो, काकडी – ५० रुपये किलो, गवार – ८० रुपये किलो, मिरची – ६० रुपये किलो, वांगी – ८० रुपये किलो, भेंडी – ६० रुपये किलो, फरसबी – ६० रुपये किलो, लालभोपळा – ५० रुपये किलो, तोतापुरी आंबा – १५० रुपये किलो, राजमा – १२० रुपये किलो, तोंडली – ६० रुपये किलो, सुरण – ६० रुपये किलो, काकडी – ४० रुपये किलो, बिट – ४० रुपये किलो, गाजर – ६० रुपये किलो, सिमला मिरची – ७० रुपये किलो, शेवगा शेंगा – १२० रुपये किलो, आले – ६० रुपये किलो, कांदा – ५० रुपये किलो, बटाटा – २० रुपये किलो, मशरुम – २०० रुपये किलो, तर पालेभाजींमध्ये मेथी – ३० रुपये जुडी, कांद्याची पात – ३० रुपये, शेपू – २० रुपये, मुळा – २० रुपये, कोथिंबीर – ६० रुपये जुडी झाली आहे.

भाव का वाढले?

या भाववाढीबद्दल अनेक वर्षांपासून कर्जत बाजारपेठेत भाजी विक्री करणारे शिवनारायण लोदी यांनी सांगितले की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. होलसेल बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.

भाजीपाला ही रोज लागणारी वस्तू आहे. भाजीपाल्याचे भाव वाढले तरी खरेदी करावीच लागते. मात्र सर्वसामान्यांचे कंबरडे भाववाढीमुळे मोडले आहे. – सुनिल ठोंबरे, ग्राहक

Recent Posts

कोकणवासीयांचे दादा…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण…

19 mins ago

MI vs LSG: स्टॉयनिसच्या खेळीने लखनौ विजयी, रोहितच्या वाढदिवशी हारली मुंबई…

MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक…

41 mins ago

राज्यातील पाणीसंकट अधिकच गडद

राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या सूचना…

1 hour ago

पंतप्रधान मोदींची १० मेला पिंपळगावला जाहीर सभा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली माहिती नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही…

2 hours ago

सर्वांगीण विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सज्ज व्हा – नारायण राणे

रत्नागिरी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला महासत्ता…

3 hours ago