काँग्रेस म्हणजेच विश्वासघात! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला काँग्रेसी कारभाराचा पंचनामा

Share

लातूर : देशाने काँग्रेसला ६० वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या ६० वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले, पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. २०१४ मध्ये सुमारे १०० सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी २६ प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसी कारभाराचा पंचनामा लातूरच्या जनतेसमोर केला.

लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांनी माढा, लातूर, धारिशिव येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरादर हल्लाबोल केला. गेल्या १० वर्षात मी माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि माझा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत वापरला, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

काँग्रेसच्या राजवटीत रोज सकाळी वर्तमानपत्रात नवीन घोटाळा उघड व्हायचा. कोलगेट घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, २-जी घोटाळा… पण आज बातम्या येतात, इथे इतके करोडो रुपये पकडले गेले. तिकडे इतके करोडो रुपये पकडले गेले, नोटांचे बंडले सापडले. काँग्रेसने आपल्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. पण, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. काँग्रेसच्या राजघराण्याने आपल्या मुलांसाठी कोणता वारसा सोडला? पैसा, देशातील प्रमुख ठिकाणी जमिनी, सत्ता आणि विशेषाधिकार आणि ६ दशकात देशाला कोणता वारसा दिला? तर फक्त गरिबी, अशी घणाघाती टीकाही मोदींनी केली.

महाराष्ट्रातील लोक जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देतात, तेव्हा ते कोणतीही कसर सोडत नाहीत. पण जेव्हा कोणी दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही, तेव्हा महाराष्ट्रातील जनता ते लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशोबही करते. १५ वर्षांपूर्वी एक मोठा नेता येथे निवडणूक लढवण्यासाठी आला होता. त्यांनी मावळत्या उन्हात दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याची शपथ घेतली होती, पण त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. २०१४ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी संपूर्ण शक्ती या सिंचन प्रकल्पांवर केंद्रित केली. काँग्रेसचे प्रलंबित असलेले १०० पैकी ६३ प्रकल्प आम्ही पूर्ण केले. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्यातील एक मोठे ध्येय आहे. विदर्भ असो किंवा मराठवाडा. पाण्याच्या थेंबासाठी लोक वर्षानुवर्षे त्रासले होते, असे मोदी यांनी आपल्या भाषणात यावेळी सांगितले.

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणतात, देशात १० वर्षांपूर्वी रिमोट कंट्रोलचे सरकार असताना महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते कृषीमंत्री होते. ते बलाढ्य नेते दिल्लीवर राज्य करायचे, तेव्हा उसाची एफआरपी २०० रुपयांच्या आसपास होती. आज भाजप सरकारच्या काळात उसाची एफआरपी ३५० रुपयांच्या आसपास आहे. आज देशातील आणि महाराष्ट्रातील जनता मोदी सरकारची १० वर्षे आणि काँग्रेस सरकारची ६० वर्षे, यातील फरक पाहत आहे. जे काँग्रेस ६० वर्षात करू शकले नाही, ते आम्ही १० वर्षात करुन दाखवले असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Recent Posts

Salary Saving : पैशांची उणीव भासतेय? सेव्हिंगचा ‘हा’ फॉर्म्युला वापरा

खर्चानंतरही भासणार नाही पैशांची अडचण! मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आपल्या भविष्याची चिंता असते.…

35 mins ago

Sanjay Dutt : ‘वेलकम ३’चा भाग नसणार संजय दत्त! केवळ एका दिवसाचं शूटिंग केलं आणि…

संजयने का केलं बॅकआऊट? मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'वेलकम टू जंगल' (Welcome to jungle)…

39 mins ago

PM Narendra Modi : कोण आहे पंतप्रधान मोदींचा राजकीय उत्तराधिकारी? स्वतः केला खुलासा

केजरीवालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यात पूर्णपणे मतदान…

1 hour ago

Covid New Variant : पुन्हा मास्क! कोरोनाच्या आणखी एका विषाणूमुळे जगाची चिंता वाढली

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला. अलिकडच्या काळात या आजाराची प्रकरणे कमी…

2 hours ago

Nitesh Rane : ४ जूनला मशाल विझणार आणि हातात केवळ आईस्क्रिमचा कोन उरणार!

भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप यांमुळे उद्धव ठाकरे लंडनला पळणार नितेश राणे यांची जहरी टीका मुंबई…

2 hours ago