Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीGunaratna Sadavarte: एसटी बँक निवडणुकीत सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय

Gunaratna Sadavarte: एसटी बँक निवडणुकीत सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय

मुंबई (प्रतिनिधी): एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची २३ जून रोजी राज्यभरातील २८१ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा आज निकाल लागला असून यात एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला. कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे मतमोजणीला पार पडली.

सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाचा सर्व १९ जागांवर विजय झाला. एसटी महामंडळातील प्रस्तापित संघटनांना सदावर्ते यांच्या पॅनलने मोठा धक्का दिला आहे. कोरोना महामारिनंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण, ७ वा वेतन आयोग अशा मुख्य मागण्यांसाठी सुमारे साडे पाच महिने चाललेल्या एसटी कामगारांचा संपाचा परिणाम एसटी बँकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. विविध पक्षांच्या प्रस्तापित कामगार संघटनांना दूर करत नव्याने एसटी महामंडळात आलेल्या दोन संघटनांनी प्रचंड मुसंडी मारली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा ही जादा मतदान घेतले. यातही सदावर्ते यांच्या पॅननले एकतर्फी विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या पॅनल मात्र, पिछाडीवर गेले असून, ७ व्या क्रमांकावर दिसून आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -