Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीउलवे गटई कामगार युनियनने स्वीकारले भाजपचे नेतृत्व

उलवे गटई कामगार युनियनने स्वीकारले भाजपचे नेतृत्व

पदाधिकारी, सदस्यांचा जाहीर पक्ष प्रवेश; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल : उलवे नोडमधील गटई कामगार युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, कोपर प्राथमिक शाळा अध्यक्ष अनंता ठाकूर, पी. के. ठाकूर, किशोर पाटील, कैलास घरत, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, सदस्य योगिता ठाकूर, कामिनी कोळी, सुनीता घरत, उषा देशमुख, उलवे नोड उपाध्यक्ष सुजाता पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी गटई कामगार युनियनचे अध्यक्ष जगजीवनराम राधेलाल राठोड, उपाध्यक्ष कैलाश गुलाबचंद अमकरे, सचिव जयसिंग फकिरा परमेश्वर, खजिनदार राजकुमार गजराज मंडराई, सदस्य राजेश शंकर परमेश्वर, विजय शांतिलाल बघेले, संतोष भोजराम मंडराई, प्रवीण विनय शिंदे, सुखदेव रामप्रसाद लोंगरे, रामलखन प्रेमलाल साकेत, राधेलाल बाल्या राठौड, सोहनलाल प्यारेलाल लोंगरे, नंदलाल राधेलाल राठौड, तुलसीराम बालाराम डोयरे, हेमंत श्याम गन्नोरे, रामजीवन मांगीलाल निमोरे, सुरज लालमणी, राजेंद्र साकेत, पूजा जगजीवन राठौड, क्षमाबाई भोजराम मंडराई, ललिता हेमंत गन्नोरे, ज्योती जयसिंग परमेश्वर, राधाबाई तुलसीराम डोयरे, क्षमाबाई प्यारेलाल लोंगरे, सावित्रीबाई राधेलाल राठौड, चंदा सोहनलाल लोंगरे, गुड्डन रामलखन साकेत, प्रियंका प्रवीण शिंदे, प्राची राजेश परमेश्वर, नंदनी विजय बघेले, सुशिला रामभरोस राठौड, किरण सोनू राठौड, अनिता महावीर डिड्वानिया, रेखाबाई कैलाश अमकरे, शांतिबाई सुखदेव लोंगरे, पार्वतीबाई राजकुमार मंडराई, प्रीती दिनेश अमकरे, किरणबाई राजेश मंडराई, विकाश फुलचंद पुरभे, मनीष प्यारेलाल लोंगरे, प्यारेलाल जगराम लोंगरे, रवी रामभरोस राठौड, सोनू रामभरोस राठौड, सुरेश रामचरण मंडराई, रामबिलास रघुनाथ अमकरे, बालकृष्ण राजकुमार मंडराई, मुकेश रामचरण मंडराई, अर्जुन प्यारेलाल लोपिते, गोकुळ प्यारेलाल लोपिते, दीपक मंडराई महावीर, धन्ना जी डिड्वानिया, दिनेश रघुनाथ अमकरे, शुभम कैलाश अमकरे, ब्रिजेश अमकरे, राजेश गजराज मंडराई, संजय, पूनम, सुनील साकेत, राजेश कुमार साकेत सियालाल, रामबती रामविलाश मंडराई, रविना अर्जुन लोपिते, सुनीता गोकुळ लोपिते, ज्योती सुरेश मंडराई, रेखा रामविलास अमकरे, राजबती मुकेश अमकरे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -