Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाU-19 World Cup 2024: टीम इंडियाची विजयी सुरूवात, बांगलादेशला ८४ धावांनी हरवले

U-19 World Cup 2024: टीम इंडियाची विजयी सुरूवात, बांगलादेशला ८४ धावांनी हरवले

मुंबई: भारतीय संघाने अंडर १९ विश्वचषकाची दमदार सुरूवात केली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले. बांगलादेशला ८४ धावांनी मोठा पराभव सहन करावा लागला. बांगलादेशसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान होते मात्र संपूर्ण संघ ४५.५ षटकांत केवळ १६७ धावांवर आटोपला. बांगलादेशसाठी मोहम्मद शिहाब जेम्सने सर्वाधिक ७७ चेंडूत ५४ धावा केल्या. अरिफुल इस्लामने ७१ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. मात्र बाकी फलंदाजांनी निराशा केली.

भारतासाठी सौम्य पांडेने सर्वाधिक विकेट मिळवल्या. सौम्य पांडेने ९.५ षटकांत २४ धावा देत ४ खेळाडूंना माघारी पाठवले. मुशीर खानला २ बळी मिळवता आले. याशिवाय राज लिंबानी, अर्शिन कुलकर्णी आणि प्रियांशु मोलियाने १-१ विकेट मिळवल्या.

भारतीय संघाने केल्या २५१ धावा

याआधी बांगलादेशचा कर्णधार टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या टीम इंडियाने ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या. भारतासाठी आदर्श सिंहने सर्वाधिक ९६ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. याशिवाय भारतीय कर्णधार उदय सहारनने ९४ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार लगावले. बांगलादेशसाठी इकबाल हौसेन इमौन सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला.

टीम इंडियाच्या विजयानंतर किती बदलले पॉईंट्स टेबल?

या विजयानंतर भारतीय संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर आर्यंलंडचा संघ आहे. दरम्यान, भारत आणि आयर्लंड हे २-२ बरोबरीत आहे. मात्र चांगल्या रनरेटमुळे आयर्लंडचा संघ टॉपवर आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना २५ जानेवारीला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना २८ जानेवारीला खेळवला जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -