Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीजुने कपडे विकण्यासाठी गमावले तब्बल साडेआठ लाख रुपये

जुने कपडे विकण्यासाठी गमावले तब्बल साडेआठ लाख रुपये

सायबर चोरट्याने क्युआर कोडद्वारे उकळले पैसे

पनवेल (वार्ताहर) : ओएलएक्सच्या माध्यमातून जुने कपडे विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका उच्चशिक्षित महिलेला अज्ञात सायबर चोरट्याने तब्बल ८ लाख ५ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

खारघर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. फसवणूक झालेली ३७ वर्षीय महिला खारघर येथे वडिलांकडे राहते. ती एका कंपनीत सिनीयर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. या महिलेने आपले जुने कपडे विकण्यासाठी ओएलएक्सवर त्याचे फोटो अपलोड केले होते.

काही दिवसांतच एका सायबर चोरट्याने या महिलेला संपर्क साधून त्याचे अंधेरी येथे फर्निचर आणि जुन्या कपड्यांचे दुकान असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडील कपडे विकत घेण्याची तयारी दर्शवून कपड्यांचे फोटो मोबाईलवर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने मोबाईलवर आपल्या जुन्या कपड्यांचे फोटो पाठवले.

त्यानंतर सायबर चोरट्याने कपडे घेण्यासाठी मुलाला त्यांच्या घरी पाठविण्याचा आणि पेटीएमद्वारे पैसे पाठविण्याचा बहाणा केला. सुरुवातीला त्याने महिलेला २ रुपयांचा एक क्युआर कोड पाठवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो क्युआर कोड महिलेने स्कॅन केले असता, तिच्या खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात झाली.

अशा पद्धतीने चोरट्याने महिलेला ११ वेळा क्युआर कोड पाठवून ते स्कॅन करण्यास भाग पाडून तिच्या खात्यातून तब्बल ८ लाख ५० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक होत असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने बँकेशी संपर्क साधून बँक खाते ब्लॉक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -