Friday, May 17, 2024
Homeदेशmichaung cyclone: बंगालच्या खाडीमध्ये वाढतेय मिचाँग चक्रीवादळाची ताकद, भारत सरकारने उचलले हे...

michaung cyclone: बंगालच्या खाडीमध्ये वाढतेय मिचाँग चक्रीवादळाची ताकद, भारत सरकारने उचलले हे पाऊल

नवी दिल्ली: कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीची आज बैठक झाली. यात बंगालच्या खाडीमध्ये येणारे चक्रीवादळ मिचौंगसाठी(michaung cyclone) राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या तयारींची पाहणी करण्यात आली. भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या संचालकांनी मायचोंगच्या वर्तमानाच्या स्थितीबाबत माहिती दिली.

दक्षिण-पूर्व आणि त्याच्या जवळील दक्षिण-पश्चिमी बंगालच्या खाडीवर दबाव गेल्या ६ तासादरम्यान १३ किमी प्रति तास गतीने पश्चिम-उत्तर-पश्चिमेच्या दिशेने वाढत आहे.येत्या २ तारखेपर्यंत याचा दबाव अधिक वाढण्याची शक्यता आहे तसेच ३ डिसेंबरच्या जवळपास बंगालच्या दक्षिण-पश्चिम खाडीवर चक्रवाती वादळात रूपांतर होम्याची शक्यता आहे. याशिवाय हे उत्तर-पश्चिमेच्या दिशेने वाढेल आणि ४ डिसेंबरला दुपारपर्यंत दक्षिण आंध्र प्रदेश आणि आसपासच्या उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पोहोचेल.

यानंतर येथे दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर समांतर उत्तरेच्या दिशेने वाढेल आणि ५ डिसेंबरच्या सकाळी नेल्लोर आणि मछलीपट्टनम यादरम्यान एक चक्रवाती वादळाच्या रूपात दक्षिण आंध्र प्रदेशाला पार करेल. यात हवेची गती ८०-९० किमी प्रति तासापासून ते १०० किमी प्रती तासापर्यंत पोहोचू शकते.

तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशाचे मुख्य सचिव आणि पाँडिचेरीच्या अर्थ सचिवांनी समितीला चक्रीवादाळाचा अपेक्षित मार्गात जनता तसेच संपत्तीच्या सुरक्षेसाठी केले जाणारे प्राथमिक उपाय आणि स्थानीय प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुरेसे आश्रय स्थळे, वीजपुरवठा, औषधे आणि आपात्कालीन सेवा तयार ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पाँडिचेरी येथे १८ टीम उपलब्ध केल्या आहेत. तसेच १० अतिरिक्ट टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -