Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीMizoram Election Result: मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली

Mizoram Election Result: मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली

नवी दिल्ली: मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी १ डिसेंबरला सांगितले की रविवार ३ डिसेंबरच्या ऐवजी सोमवारी ४ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले, मिझोरमच्या लोकांसाठी रविवारचे विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. तारीख बदलण्याबाबत अनेक लोकांनी आम्हाला सांगितले होते. मिझोरमच्या ४० जागांसाठी मतदान ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते.

तीन डिसेंबरला रविवार आहे. रविवारच्या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोक चर्चला जातात. याच कारणामुळे तारखेत बदल करण्यात आला आहे. या राज्यात ७८ टक्के जनता ख्रिश्चन समाजाची आहे. लोकांची मागणी होती की निकालाच्या तारखेत बदल करण्यात यावा. याआधी मिझोरममध्ये झालेल्या निवडणुकीचा निकालही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्याच दिवशी ३ डिसेंबरला लागणार होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -