Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीभीमा नदीत मृतावस्थेत सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नव्हे हत्याच

भीमा नदीत मृतावस्थेत सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नव्हे हत्याच

चुलत्यानेच पवार कुटुंबाला संपवले!

पुणे : पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची तीन मुले यांचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते.

एकिकडे कौटुंबिक वादातून सात जणांची हत्या म्हणजे सुनियोजित कट असल्याचे म्हटले जात आहे. तर काहीजण हे हत्यांकड अंधश्रद्धेतून घडल्याचे म्हणत आहेत.

शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांना होता. मोहन पवार आणि कुटुंबियांनी काळी जादू केली आणि त्यामुळेच धनंजयचा मृत्यू झाला असे त्याच्या कुटुंबाला वाटत होता. अपघात दोघांचा झाला मात्र यात फक्त धनंजयचा मृत्यू कसा झाला असा राग धनंजयच्या कुटुंबाच्या मनात होता. त्यामुळे धनंजयच्या कुटुंबीयांनी मोहन पवार यांच्या कुटुंबाचा काटा काढायचे ठरवले होते.

त्यामुळे धनंजय पवार यांच्या कुटूंबाने कट रचला. मोहन पवार यांच्या कुटूंबाला यवत येथे परत आणले. त्यानंतर संधी साधून रात्रीच्या सुमारास त्यांना गळा दाबून मारण्यात आले. त्यानंतर भीमा नदीत फेकण्यात आले. त्यामध्ये तीन मुले देखील आहेत. झोपलेल्या अवस्थेतच ७ जणांची हत्या करण्यात आली असावी, असा संशय आहे. पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -