Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीShinde Vs Thackeray : अकोल्यामध्ये ठाकरे गटाला पडलं भगदाड; असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

Shinde Vs Thackeray : अकोल्यामध्ये ठाकरे गटाला पडलं भगदाड; असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

पालघरमध्येही नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार्‍या कार्यकर्त्यांचा ओघ काही थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे ठाकरे गट दिवसेंदिवस दुबळा बनत चालला आहे, तर अनेक बड्या नेत्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे. नुकतेच अकोल्यातही (Akola News) काही कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला धक्का देत मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर पालघरमध्येही नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील उद्योजक तुकाराम दुधे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष उमेश लक्ष्मणअप्पा भुसारी, श्रीराम संघटनेचे पप्पू श्रीराम मोरवाल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काल रामगिरी या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार सदा सरवणकर, माजी कॅप्टन अभिजित अडसूळ आणि अकोल्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालघरमध्येही नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

पालघर (Palghar) ही अत्यंत महत्त्वाची नगरपरिषद आहे. याच परिषदेतील उत्तम घरत, बंड्या म्हात्रे या दोन नगरसेवकांनी काल पालघरमध्ये ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत आणखी दोन नगरसेवक आणि आठजण प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

गेल्या महिन्यात ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यात पालघरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांनी पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणून गेल्या दहा दिवसांपासून अनेक लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला सुरुवात केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -