Monday, May 20, 2024
Homeक्रीडाAsia Cup Prize: आशिया चषक जिंकल्यावर टीम इंडियावर पैशांचा वर्षाव

Asia Cup Prize: आशिया चषक जिंकल्यावर टीम इंडियावर पैशांचा वर्षाव

कोलंबो: भारतीय संघाने आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) अंतिम सामन्यात श्रीलंकेला १० विकेटनी मात देत तब्बल ५ वर्षांनी हा खिताब आपल्या नावे केला. टीम इंडियाने आशिया चषकाच्या इतिहासात आठव्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला म्हणजेच भारतीय संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. फायनल सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवत विजयात मोलाची कामगिरी बजावली.

मोहम्मद सिराजने या सामन्यात ६ विकेट मिळवण्यासोबतच श्रीलंकेच्या संघाला ५० धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने श्रीलंकेचे ५० धावांचे आव्हान केवळ ६.१ षटकांत पूर्ण केले, टीम इंडियाला यानंतर बक्षीस म्हणून १५०,००० यूएस डॉलर मिळाले. तर श्रीलंकेच्या संघाला उपविजेता म्हणून ७५,००० यूएस डॉलरची रक्कम मिळाली.

कुलदीप यादवला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंटचा खिताब

आशिया चषक २०२३मध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यात कुलदीप यादवचे नाव आघाडीवर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५ आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ विकेट मिळवल्या. कुलदीपने या सामन्यात शानदार कामगिरी केली त्याला प्लेयर ऑफ दी टूर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला. यात त्याला १५,००० यूएस डॉलरचे बक्षीस देण्यात आले.

मोहम्मद सिराजने फायनल सामन्यात मॅच विनिंग कामगिरी केली. त्याला प्लेयर ऑफ दी मॅचचा खिताब देण्यात आला. सिराजला या अवॉर्डच्या रूपात ५ हजार डॉलर इतकी रक्कम मिळाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -