Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीTalathi exam server down : सकाळी ९ ते ११ च्या तलाठी परिक्षेला...

Talathi exam server down : सकाळी ९ ते ११ च्या तलाठी परिक्षेला विद्यार्थी अजूनही केंद्राबाहेर!

सर्व्हर झाले डाऊन…

छत्रपती संभाजीनगर : आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा पार पडते आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन आहेत. त्यामुळे नोंदणीप्रक्रिया देखील पू्र्ण झालेली नाही. सकाळी ९ ते ११ ही परिक्षेची वेळ आहे मात्र सर्व्हरच्या कारणाने परीक्षा सुरु होऊ शकत नाही आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून ते अजूनही परीक्षा केंद्राबाहेर खोळंबले आहेत.

विद्यार्थ्यांच्या मनात यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. परिक्षेची वेळ वाढवून मिळणार का? आता परीक्षा घेतली जाणार का? काही विद्यार्थी तर पुण्याहून छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रावर आले आहेत. तर परीक्षा फी भरल्यामुळे व आता ही अशी समस्या उद्भवल्यामुळे काही विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांकडून मिळणार्‍या प्रतिक्रियेनुसार अधिकार्‍यांकडून कोणतीही माहिती पुरवण्यात आलेली नाही, विद्यार्थी केवळ परीक्षा सुरु होण्याची वाट बघत केंद्रांबाहेर थांबले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -