Monday, May 20, 2024
Homeक्रीडाT-20 World Cup : पाकिस्तानच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

T-20 World Cup : पाकिस्तानच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवानंतरही क्रिकेटपटू मालामाल

कराची (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. संघातील हे खेळाडू मालामाल झाले आहेत.

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून सुमारे दहा लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले. यात उपविजेता आणि सुपर-१२ मधील सामना जिंकल्याबद्दलच्या बक्षीसांचा समावेश आहे. ही बक्षीस रक्कम पाकिस्तानच्या चलनात रूपांतरित केली तर २२ कोटी २५ लाख इतकी होईल. ज्यानंतर ही रक्कम १७ भागांमध्ये विभागली जाईल. त्यापैकी १६ खेळाडूंना आणि एक भाग व्यवस्थापनाकडे जाईल. ज्यानंतर अंदाजे प्रत्येक खेळाडूला पाकिस्तानी चलनात सुमारे एक कोटी ३० लाख रुपये मिळतील.

Charger : मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेटसाठी एकच चार्जर

पाकिस्तान संघातील मोहम्मद हसनैन आणि खुशदिल शाह यांनी टी-२० विश्वचषकात एकही सामना खेळला नाही, परंतु असे असूनही त्यांना एवढी मोठी रक्कम मिळणार आहे. याशिवाय फखर जमाननेही या स्पर्धेत केवळ एकच सामना खेळला होता. पण असे असूनही त्याला ही मोठी रक्कम मिळणार आहे. स्पर्धेदरम्यान, खेळाडूंना आयसीसीकडून डॉलर्समध्ये भत्ता देखील मिळत होता. जो दरदिवसासाठी अंदाजे ९ हजार ५०० रुपये इतका होता.

Vikram S : भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस लाँच

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -