Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीस्वामी समर्थ दिव्य नाममहिमा

स्वामी समर्थ दिव्य नाममहिमा

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

स्वामी म्हणे पुढे निळे आकाश
मागे केसरी आकाश
उत्तुंग ते सोनेरी आकाश
सर्वत्र चंदेरी प्रकाश।।१।।
आयुष्याचा प्रवास करा सावकाश
स्वामींचे नाम घ्या पाहुनी अवकाश
मीच केले प्रकाशमान ते आकाश
मीच दूर करेन दुःखाचा फास।।२।।
मनी ठेवा चांगला भाव
स्वामीसारखा सरळ भाव
पाच पांडव माझेच भाव
श्रीकृष्ण माझा सहावा भाव।।३।।
दत्तगुरू माझा गुरुबंधू भाव
ब्रह्मा विष्णू महेश तिसरा भाव
हनुमान-भीम बलराम तिसरा भाव
शनी मंगळ उग्र स्वभाव।।४।।
मला स्मरताच त्यांचे शांत स्वभाव
नाही आयुष्यात काही अभाव
सर्वत्र आहे माझाच प्रभाव
दशदिशा मज माहीत पूर्ण ठाव।।५।।
साईनाथ माझाच बंधू
गजानन शेगावी राहतो बंधू
नित्यानंदस्वामी तिसरा बंधू
पिंगुळीचे राऊळ महाराजही बंधू।।६।।
नागपूरचे महाराज माझा बंधू
वामनराव पै शिष्य बंधू
बेलसरे महाराज शिष्य बंधू
विवेकानंद परमहंस माझे बंधू ।।७।।
मीच चालवितो संप्रदाय नाथ
ज्ञानेश्वर बंधू निवृत्तिनाथ
मुक्ताबाई बंधू सोपान नाथ
सारे उत्तम बंधू छान निवृत्तीनाथ ।।८।।
महा हुशार तो कानिफनाथ
गुरु बंधू हुशार एकनाथ
अनाथ गरिबांचाही नाथ
गाय, वासरू, पाडसांचा नाथ ।।९।।
हरिणीच्या पाडसाला सांभाळतो नाथ
चिमणी पिल्लांचा मीच नाथ
माझे नाम घेऊनी मोर करतो नाच
पोपट मैना हंस करतात नाच ।।१०।।
शांतपणे करा तुम्ही संसार
प्रगती करा सांभाळूनी संसार
घ्या स्वामी नाम प्रत्येक वार
आनंदी होईल प्रत्येक रविवार ।।११।।
सूर्यदेवाला स्मरा रविवार
शंकराला स्मरा तो सोमवार
प्रसन्न होईल लाल मंगळवार
ब्रहस्पतीला करा प्रसन्न बुधवार।।१२।।
आरती करा दत्तगुरूची गुरुवार
अमृत देतील शुक्राचार्य शुक्रवार
शनी प्रसन्न होईल शनिवार
प्रेमाने राहा नका करू वार।।१३।।
तोंडात ठेवूनी साखर रहा प्रसन्न
बर्फ डोक्यावरती डोके शांत प्रसन्न
पायाला लावा चक्र मिळेल मिष्ठान्न
करा गरिबा नेहमी दान अन्न।।१४।।
गाय वासरू द्या पवित्र अन्न
चिमणी कावळा दाणा पाणी अन्न
टिटवी बदक पोपट पेरू डाळ अन्न
नदी विहीर मासा द्या पिठ गोळे अन्न।।१५।।
हसतमुख चेहरा ठेवा प्रसन्न
आज्ञाधारक राहणे मालक प्रसन्न
साऱ्याना मदत सारेच प्रसन्न
स्थिर होईल तुमचे आसन।।१६।।
द्या सदा मदतीचा हात
ईश्वर करील पुढेच हात
कराल संकटार हळू मात
टळेल आकाशीचा प्रपात।।१७।।
उठून पहाटे करा सूर्यनमस्कार
करा रोज निरनिराळे प्रकार
शांत चित्ते करा व्यायाम प्रकार
आनंदाने करा योगासनाचे प्रकार।।१८।।
रोगी माणसाला अनेक विकार
अंगात रोगाचे अनेक प्रकार
धावा, पळा, चालण्याचे प्रकार
ब्रह्ममुहूर्तावर पळे विकार।।१९।।
फळे भाज्या खा भरपूर
आवळा, फणस आंबे भरपूर
बोरे करंवद रतांबे भरपूर
मुळा काकडी रताळी भरपूर ।।२०।।
सकाळ-संध्याकाळ घ्या राम नाम
साऱ्या जगात पवित्र राम नाम
राम हनुमान धावती घेता नाम
विभीषण होई पवित्र घेता राम नाम।।२१।।
जाता बेंबीत रामबाण राम नाम
रावणही झाला पवित्र घेऊन राम
नाम
दगड तरंला समुद्रात ठेवता राम
नाम
लक्ष्मण जगला घेऊनी राम नाम
।।२२।।
भरत सदा सर्वकाळ घेई राम नाम
रावणा घरी सीता पवित्र राम नाम
मंदोदरी घेई पवित्र राम नाम
कैकई, मंथरा झाली माफ घेता राम
नाम ।।२३।।
सुग्रीव वाली युद्धात तरले
राम नाम
श्रीलंका पूल तरला घेऊनी
राम नाम
हनुमान, जांबुवत घेई
राम नाम
अगंद, खार, वानर घेई
राम नाम ।।२४।।
तुम्ही घ्या ईश्वरी राम नाम
घ्या कुलदेवतेचे नाम
घ्या समर्थ समर्थ नाम
घ्या स्वामी समर्थ नाम ।।२५।।
तुका तरला घेता विठ्ठल नाम
अभंग वही तरली विठ्ठल नाम
पुंडलीक तरला विटेवरी नाम
पायरी पायरीवर पुंडलीक नाम ।।२६।।
शेकडो मैल चालताना विठ्ठल नाम
वारकऱ्याची वारी घेते विठ्ठल नाम
पालखी भालदार घेतो विठू नाम
रिंगणातही चाले विठू नाम ।।२७।।
शास्त्रज्ञानाही कळले विठूनाम
शास्त्रशुद्ध ठरते विठ्ठल नाम
घेता विठ्ठलनाम जणू नदीतली नाव
हृदय, मेंदू स्थिर घेता देव नाम ।।२८।।
घ्या माता-पिता श्रेष्ठ नाम
कुलदेवताही आहेत श्रेष्ठ नाम
सीता, तारा, मंदोदरी श्रेष्ठ नाम
रामरक्षा अतिश्रेष्ठ नाम ।।२९।।
हनुमानस्त्रोत्र उत्तम नाम
भागवत पुराण झकास नाम
भगवत गीता सर्वश्रेष्ठ नाम
विनोबा गीताई उत्तम नाम।।३०।।
नको देवा जीवन परावलंबी
रोगी जर्जर आयुष्य लंबी
नको तोंड वाकडे जीभ लंबी
डोळे खोल हाती कटोरा काठी लंबी।।३१।।
नको भीक मागणे गरिबी
ठेव मला तुझ्याच करीबी
तुच आमुचा सूर अन सुरभी
समर्थ नामाची श्रीमंती दूर गरिबी ।।३२।।
स्वामी नाम घेता तरला चोळप्पा
समर्थ नाम घेता तरला बाळप्पा
स्वामी सुत तरले बनूनी आप्पा
सुंदरा बुडाली स्वामी रवप्पा ।।३३।।
तावडे बनविल्या चर्म पादुका
नलावडे करील्या चांदी पादुका
नाना वेदक केल्या मुकुट पादुका
पालशेतकर केली पालखी पादुका ।।३४।।
स्वामीकृपे सुवर्ण अक्कलकोट
संकटात स्वामी करती छातीचा कोट
उघड्याला देती स्वामी प्रेमाने कोट
गरीबालाही सोनेरी कोट।।३५।।
सदोदित राहा तुही हसत
नका चिखलात जाऊ फसत
जसा कमळात भूंगा जाई
स्वामी नामात दिनरात घुसत ।।३६।।
स्वामी सर्व सुखाचे राजे
दुःख पळून जाई लाजे लाजे
आनंद सुखाचे घुंगरू वाजे
स्वामी संकटाला पाणी पाजे ।।३७।।
स्वामी नाम घेता जग तरले सारे
संपले जगातले वारे सारे
मोर नाचती पसरूनी पिसारे
दुःख सारे विसरा जोरात नाचारे ।।३८।।
स्वामींचा साऱ्यांना आनंदी निरोप
स्वामी वाढविती सुंदराचे स्वरूप
स्वामी आशीर्वाद जगाला प्ररूप
स्वामी ईश्वराचे अगाध रूप ।।३९।।
स्वामी नाम आनंदाचा कंद
स्वामी नाम आनंदाचे अंग
स्वामी नामे मोरस्पर्श अंग अंग
स्वामी नाम प्रेमाचा गुलकंद ।।४०।।

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -