Tuesday, May 21, 2024
Homeमहत्वाची बातमीAfghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपाचे तीव्र झटके, तीव्रता ६.३ रिश्टर स्केल

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपाचे तीव्र झटके, तीव्रता ६.३ रिश्टर स्केल

काबूल: अफगाणिस्तानात(afganistan) आज पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के(earthquake) जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी भूकंप आला.या भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हेरात शहरापासून २८ किमी दूर अंतरावर १० किमी आत होता.

अफगाणिस्तानात गेल्याच आठवड्यात शनिवारी आलेल्या भूकंपात तब्बल ३ हजार लोकांचा बळी गेला. सैन्य हस्तांतरणाच्या माध्यमातून अफगाणिस्तानवर राज्य करत असलेल्या सरकारने भूकंपात मारले गेलेल्या लोकांच्या संख्येला दुजोरा दिला.

भरपूर लोकसंख्येचे शहर आहे हेरात

हेरात लोकसंख्येच्या दृष्टीने अफगाणिस्तानचे चौथे मोठे शहर आहे. गेल्या शनिवारी जेव्हा भूकंप आला तेव्हा यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला फटका बसला. एजन्सीने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू हेरातपासूनसाधारण ४० किमी उत्तर पश्चिमेला होते. भूकंप आल्यानंतर भले तेथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली.

तालिबानचे प्रवक्ता अब्दुल वाहिद रेयानने सांगितले की मरणाऱ्यांची संख्या सुरूवातीला जी सांगितली गेली त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. भूकंपात अनेक गाव नष्ट झाले आणि शेकडो नागरिक मलब्याखाली अडकले आहेत. रेयान म्हणाले, २०६० लोकांचा यात मृत्यू झाला आहे तर १२४० लोक जखमी झालेत. १३२० घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -