Monday, May 20, 2024
Homeमहामुंबईम्हाडाच्या सोडतीला तुफान प्रतिसाद

म्हाडाच्या सोडतीला तुफान प्रतिसाद

तीन तासांत ६५५ अर्ज; २०८ अर्जदारांनी भरली अनामत रक्कम

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते सोमवारी ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सोडतीचे अर्ज भरण्याचा शुभारंभ होताच पहिल्या तीन तासांत ६५५ अर्जदारांनी अर्ज केले. तर २०८ अर्जदारांनी याच वेळेत अनामत रक्कम भरल्याने मुंबई मंडळाच्या सोडतीला तुफान प्रतिसाद लाभल्याचे दिसत आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीकडे अर्जदारांनी पाठ फिरवली होती. ही सोडत पार पडताच मुंबई मंडळाने सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज भरण्याचा शुभारंभ सोमवारपासून केला. या प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत कार्यक्रम १८ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात आयोजित करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळाच्या सोडतीचा शुभारंभ केल्याच्या दहा मिनिटांमध्ये सुमारे ११५ अर्ज सोडत प्रणालीत प्राप्त झाले होते. तर सहा अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५५ अर्जदारांनी अर्ज भरले. तर २०८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीमध्ये प्रवेश निश्चित केला.

२२, मे रोजी दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. त्याचबरोबर २६ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. २८ जून रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस/एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप यादीवर अर्जदारांना ७ जुलैपर्यंत हरकती दाखल करता येणार आहे. यानंतर १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -