Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीसोमय्या सहकुटुंब पोलीस ठाण्यात दाखल, राऊतांविरोधात तक्रार

सोमय्या सहकुटुंब पोलीस ठाण्यात दाखल, राऊतांविरोधात तक्रार

मुंबई : किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी चारित्र्यहनन केल्याप्रकरणी संजय राऊतांच्या विरोधात मुलूंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलूंड पोलीस ठाण्यात सोमय्या कुटुंबीयांसह दाखल झाले होते. आयपीसी ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. मिरा-भाईंदरमध्ये शौचालय घोटाळ्यात राऊत यांनी मेधा सोमय्यांवर आरोप केले होते.

सोमय्या कुटुंबीयांनी १०० कोटींचा घोटाळा करत सर्वसामान्यांचा पैसा लाटल्याचे त्यांनी म्हटले होते. याप्रकरणात माफी मागण्यासाठी सोमय्यांनी अल्टिमेटम दिला होता. मात्र राऊतांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने सोमय्यानी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मिरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना मिळाले. त्यांचे युवक प्रतिष्ठान आहे. यामार्फत हे कंत्राट मार्गी लावण्यात आले. मात्र, बनावट कागदपत्रे सादर करून, पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

साडे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -