Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेऑनलाईन अ‍ॅपमार्फत ४०० जणांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बाब

ऑनलाईन अ‍ॅपमार्फत ४०० जणांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बाब

मुख्य आरोपी मौलवीला अटक तर शाहनवाज याचा कसून शोध सुरु

मुंब्रा : राज्यभरात धर्मांवरुन दंगली होत असतानाच एक खळबळजनक बाब समोर आली आहे. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मांतरप्रकरणी तब्बल ४०० जणांचे धर्मांतर केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे गाझियाबाद पोलिसांना आलेल्या एका फोन कॉलमुळे हाती लागले. देशभरात हे प्रकरण गाजत असतानाच आता त्याची लिंक मुंबईजवळील मुंब्रा भागात पोहोचली आणि येथून ४०० जणांचे धर्मांतर झाल्याचे समजते आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी गाझियाबादमधील मशिदीचा एक मौलवी याला अटक करण्यात आली असून शाहनवाज याचा कसून शोध सुरु असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

गाझियाबादमध्ये दोन अल्पवयीन तरुणांच्या नातेवाइकांनी मुलांचे धर्मांतर झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, आरोपीने त्याचे धर्मांतर तर केलेच पण त्याला दिवसातून पाच वेळा नमाज पढायलाही लावले. ऑनलाइन गेमिंगद्वारे तरुणांचे धर्मांतर केल्याप्रकरणी पोलिसांनी गाझियाबाद सेक्टर २३ मशिदीतील मौलवी अब्दुल रहमान उर्फ नन्नी याला अटक केली आहे. हा मौलवी गेल्या दोन वर्षांपासून या मशिदीत सेवा करत होता. त्यानेच दोन्ही अल्पवयीन मुलांना धर्मांतराचे भाषण दिले.

गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये तब्बल ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याचा उल्लेख होता. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. गाझियाबादमध्ये ३० मे रोजी सर्वप्रथम हे प्रकरण उघडकीस आले. शाहनवाज मकसूद खान या मुख्य आरोपीच्या शोधासाठी गाझियाबाद विशेष पथक मुंब्रा येथे आले. मात्र अजून त्याचा ठोस सुगावा लागलेला नाही.

मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद खान नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता. या भागात तो बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातून गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. या गेममध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार नसल्याचे आमिष दाखवत होता. मात्र, सध्या तो फरार आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

काही दिवसांपूर्वी गाझियाबादमधील एका १७ वर्षीय जैन मुलाने घरच्यांना काहीच कल्पना न देता इस्लाम धर्मात प्रवेश केल्याचे उघडकीस आले. हा मुलगा जीमचे कारण सांगून दिवसांतून पाच वेळा गुपचूप नमाज पढायला जायचा. कुटुंबियांनी चौकशी केल्यावर तो मशिदीत जात असल्याचे समजले. त्या मुलाने मुस्लीम धर्म स्वीकारल्याची कबुली दिली आणि हे धर्मांतर ऑनलाईन गेमद्वारे केल्याचा खुलासा झाला.

पोलीस तपासात असे समोर आले आहे की या किशोरवयीन मुलांसोबत काही मुस्लीम मुले आपली नावे बदलून नाईट गेम अ‍ॅपसाठी ऑनलाइन गेम खेळत असत. डिसकॉर्ड अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम मुले युजर आयडी तयार करत आणि हिंदू मुलांशी चॅट करत, त्यांना इस्लामिक रितीरिवाज अंगीकारण्यासाठी प्रवृत्त करत, त्यांना भाषणे दाखवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करत. या मुलांची माइंड वॉश झाल्यावर त्यांना मशिदीत नेऊन त्यांचे धर्मांतर केले जाई.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -