Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीShiv Thakare : पेपर, दुधाची लाईन ते थेट हक्काचं घर; अमरावतीचा शिव...

Shiv Thakare : पेपर, दुधाची लाईन ते थेट हक्काचं घर; अमरावतीचा शिव ठाकरे झाला मुंबईकर!

काहीच दिवसांपूर्वी घेतली होती ३० लाखांची गाडी

मुंबई : शिव ठाकरे (Shiv Thakare) हा टेलिव्हिजन विश्वातील (TV industry) प्रसिद्ध चेहरा असून बिग बॉस (Bigg Boss), खतरों के खिलाडी (Khatron ke Khiladi) अशा रिअॅलिटी शोजमधून (Reality Shows) तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मूळ अमरावतीच्या असलेल्या शिवने त्याच्या स्टाईलमुळे आणि फिटनेसमुळे स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या तो ‘झलक दिखला जा 11’ (Jhalak Dikhhla Jaa 11) या शोमुळे बराच चर्चेत आहे. त्यातच शिवने त्याच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. अमरावतीचा शिव आता मुंबईकर झाला आहे. त्याने मुंबईत स्वतःचं हक्काचं आलिशान घर खरेदी केलं आहे.

शिवने आठ दिवसांपूर्वी मुंबईत घर घेतलं. नववर्षाचा मुहूर्त साधून त्याने ही बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली. नवीन घर घेतल्यानिमित्त फराह खानने शिवला एक गणेश मूर्ती भेट दिली आहे. आपला आनंद व्यक्त करताना शिव म्हणाला की, “२०२३ हे वर्ष माझ्यासाठी खूपच खास होतं. या वर्षात आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या. सेकंड हँड कार खरेदी करण्याची माझी इच्छा होती. पण या वर्षात मी ३० लाख रुपयांची नवी कार विकत घेतली”.

शिव पुढे म्हणाला, “मुंबईत स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराच्या वाढत्या किंमती आणि कर्जाचे हप्ते यात संपूर्ण आयुष्य जातं. अखेर याच मुंबईत मी हक्काचं आलिशान घर घेतलं आहे. आठ दिवसांपूर्वीच मी नवीन घर घेतलं आहे”.

शिव ठाकरे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. इन्स्टावर त्याचे २.४ मिलीयन म्हणजेच २० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. रिअॅलिटी शोजमधील त्याची खेळी चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरते. असं असलं तरी प्रसिद्धी मिळण्याआधी शिवने खूप मेहनत घेतली आहे. पैशांसाठी त्याने वृत्तपत्र विकण्याचे काम केले आहे. तसेच तो घरोघरी जाऊन दुधाच्या पिशव्यांची विक्री करत होता. पुढे डान्सची आवड असल्याने त्याने डान्स क्लास घ्यायला सुरुवात केली. या सर्व कामांतून मिळणारे पैसे शिव त्याच्या आईला देत असे. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं हे ध्यानात ठेऊन शिवने आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. शिवच्या या प्रगतीचं चाहते कौतुक करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -