Monday, May 20, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023ICC ODI Rankings: शाहीन बनला नंबर वन, रोहित-विराटचा जलवा कायम

ICC ODI Rankings: शाहीन बनला नंबर वन, रोहित-विराटचा जलवा कायम

मुंबई: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये(icc one day ranking) मोठा बदल झाला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने जबरदस्त कामगिरी करताना रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. तर बॅटिंगमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या बाबरची दहशत संपवण्यासाठी शुभमन गिल केवळ एक पाऊल दूर आहे. याशिवाय रोहित शर्मा आणि विकोट कोहली यांचा टॉप १०मध्ये जलवा कायम आहे.

शाहीन शाह आफ्रिदीने ६७३ रेटिंगसह ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूडला मागे टाकले आणि नंबर वन बनला. भारताचा मोहम्मद सिराज एका स्थानांनी घसरून ६५६ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आला आहे. यानंतर द. आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराज चौथ्या आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पाचव्या स्थानावर आहे.महाराजजवळ ६५१ आणि बोल्टकडे ६४९ रेटिंग आहेत.

नंबर वन बनण्याच्या जवळ शुभमन गिल

भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल गेल्या काही काळापासन वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सातत्याने पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र लवकरच बाबरचे वर्चस्व संपू शकते कारण गिल नंबर वन बनण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. बाबर आझमचे रेटिंग ८१८ आहे तर शुभमन गिलचे रेटिंग ८१६ आहे. अशात दोघांच्या रेटिंगमध्ये केवळ दोन गुणांचे अंतर आहे. विश्वचषकातील पुढील सामन्यांमध्येही गिल अगदी सहज अव्वल स्थान गाठू शकतो.

विश्वचषक २०२३मध्ये चांगल्या फॉर्मात दिसत असलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा रँकिंगमध्ये ७४३ पॉईंट्सह पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय विराट कोहली ७३५ रेटिंगसह सातव्या स्थानावर आहे. द. आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन कोहलीपेक्षा एक स्थान वर आहे. तर टॉप ५मध्ये बाबर आणि शुभमननंतर तिसऱ्या स्थानावर द. आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक ७६५ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आणि चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आहे. त्याच्याकडे ७६१ रेटिंग आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -