- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये भाविकांची होणारी अफाट गर्दी लक्षात घेता, प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रात्री उशिरापर्यंत, तसेच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, गणेशोत्सवाच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगाब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. गणेशोत्सवात मुंबईसह उपनगरांतील विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पाच्या आगमनानिमित्त लाखो नागरिक रात्रीच्या वेळीही मोठ्या संख्येने बाहेर पडतात. यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर लोकल रेल्वे आणि मेट्रोचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या फेऱ्यांमधील अंतर (हेडवे) कमी करून अधिक फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळेत मेट्रोची शेवटची फेरी उशिरापर्यंत सुरू ठेवून भाविकांसाठी विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही सांगण्यात आले आहे.
Eknath Shinde : 'एसटी'च्या ग्रुप बुकिंगसाठी लागणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
- गणेशोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; लाखो गणेश भक्तांना दिलासा मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा ...






