लाहोर: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शिस्तभंगाच्या आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका खेळाडूवर कठोर कारवाई केली आहे. पाकिस्तानचा देशांतर्गत क्रिकेटपटू हमजा नझर (Hamza Nazar) याच्यावर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन व्हिसा अर्ज केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय त्याच्यावर १० लाख रुपयांचा दंडही (PKR 1 Million) ठोठावण्यात आला आहे.
नवी दिल्ली : प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या लोकप्रिय रेडमी नोट सिरीजचा विस्तार करत भारतीय बाजारात नवा Redmi Note 17 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. ...
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माध्यमातून व्हिसासाठी अर्ज करताना हमजा नझरने अपूर्ण, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर पीसीबीने याची गंभीर दखल घेत एक तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीने संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेतला आणि हमजाला आपली बाजू मांडण्याची संधीही दिली.
चौकशीत दोषी आढळल्यानंतर पीसीबीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. या दोन वर्षांच्या बंदीमुळे हमजा नझर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमधील कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत घडलेल्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रकरणात पोलिसांनी ...
कोण आहे हमजा नझर?
-
२७ वर्षीय हमजा नझर हा पाकिस्तानमधील एक अष्टपैलू (All-rounder) क्रिकेटपटू आहे.
-
त्याने अद्याप पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेले नाही.
-
त्याने आतापर्यंत १६ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ७४७ पेक्षा जास्त धावा केल्या असून २६ गडी बाद केले आहेत. तसेच लिस्ट ए आणि टी-२० सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.
बोर्डाने स्पष्ट केले आहे की, क्रिकेटच्या नियमांशी विसंगत असणारे आणि बोर्डाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही.






