Nashik News : नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था यासाठी पोलिसांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठे पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. (Arms and curfew orders)
Shalarth ID Scam: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात (Shalarth ID Scam) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे. या ...
11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी
नाशिक शहर कार्यक्षेत्रात 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शस्त्र व जमावबंदीचा महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
भोपाल : एकेकाळी मानवी वस्तीने गजबजलेला परिसर आज वाघांच्या अधिवासात रूपांतरित झाला आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पाने संवर्धनाच्या ...
या आदेशातून कोणाला सवलत आहे ?
धार्मिक व सामाजिक कार्यक्रम: लग्नकार्य, मिरवणुका आणि प्रेतयात्रा.
व्यापार: आठवडी बाजार.
अधिकृत परवानग्या: ज्या सभा किंवा मिरवणुकांसाठी प्रशासनाची रितसर परवानगी घेतली आहे.
सरकारी कर्मचारी: ऑन-ड्यूटी पोलीस अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचारी.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. कर्णिक यांनी आदेशात नमूद केले आहे.






