Nashik : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. स्वतःला आध्यात्मिक सल्लागार आणि ज्योतिषी म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरातकडे ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण, प्रशिक्षण किंवा मान्यताप्राप्त प्रमाणपत्रच नसल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने आपल्या अभियोग तक्रारीत केला आहे. तरीही तब्बल दोन दशकांहून अधिक काळ त्याने प्रभावशाली व्यक्तींमध्ये आपली प्रतिमा निर्माण करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (Ashok Kharat News)
मुंबई : गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त राज्यातील सुमारे २ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी ...
अंकशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण नाही
अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी सुरू असतानाच ईडीच्या अभियोग तक्रारीत अनेक गंभीर दावे करण्यात आले आहेत.उत्पन्नाच्या तुलनेत प्रचंड संपत्ती जमा केल्याच्या आरोपांची चौकशी करताना ईडीने अशोक खरातची सखोल चौकशी केली. या चौकशीत खरातने स्वतः कबूल केल्याचा दावा ईडीने केला आहे की, त्याने कधीही ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. तसेच कोणतेही अधिकृत प्रशिक्षण किंवा मान्यताप्राप्त प्रमाणपत्रही त्याच्याकडे नव्हते. (Ashok Kharat News)
Nashik : नाशिक जिल्ह्यातील चांदोरी आणि सायखेडा या गावांना दुसऱ्या दिवशीही शनिवारी ( दि.२५) पुराच्या पाण्याचा वेढा कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ...
कुटुंबीयांच्या नावावर मालमत्ता खरेदी
असे असतानाही अशोक खरातने स्वतःची प्रतिमा एक प्रभावी आध्यात्मिक सल्लागार, भविष्यवेत्ता आणि धार्मिक विधी करणारा व्यक्ती म्हणून निर्माण केली. त्याच्या भविष्यवाण्या, धार्मिक विधी आणि तथाकथित आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे अनेक उद्योगपती, व्यावसायिक, राजकारणी आणि इतर प्रभावशाली व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित झाल्याचा दावा ईडीने केला आहे. याच प्रभावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोपही तपास यंत्रणेने केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान अशोक खरातने स्वतःच्या उत्पन्नातून कुटुंबीयांच्या नावावर अनेक स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे मान्य केले.तपासादरम्यान नऊ मालमत्तांच्या खरेदीची माहिती समोर आली. (Ashok Kharat News)
हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे सुरू आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून ...
प्रकरणाला आणखी गंभीर वळण
दरम्यान, या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून ईडीने केलेले सर्व आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत. त्यामुळे या तक्रारीतील दावे हे तपास यंत्रणेचे आरोप असून, त्यावर अंतिम निर्णय न्यायालयाकडून दिला जाणार अशोक खरात प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे समोर येत असून आता ईडीच्या तक्रारीमुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. पुढील न्यायालयीन सुनावणीत या आरोपांबाबत काय निष्कर्ष निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






