Saturday, July 25, 2026

IND VS ZIM : हरारेमध्ये ईशान किशनचे वादळ, झिम्बाब्वेसमोर २२० धावांचं लक्ष्य

IND VS ZIM : हरारेमध्ये ईशान किशनचे वादळ, झिम्बाब्वेसमोर २२० धावांचं लक्ष्य

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे सुरू आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने भारताला सुरुवातीला दोन मोठे धक्के दिले होते. मात्र, ईशान आणि तिलक यांच्या भागीदारीने झिम्बाब्वेच्या योजनांवर पाणी पडले. भारताने २० षटकांत ५ बाद २१९ धावा केल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वेसमोर २० षटकात २२० धावा करण्याचे आव्हान आहे.(Vaibhav Sooryvanshi)

या सामन्यात वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज सुरुवात केली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर तो नऊ चेंडूंमध्ये २० धावा करून बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करून भारताच्या डावाला सावरले. अय्यरने २६ धावा केल्या, तर किशनने नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या. तिलकच्या २९ चेंडूंतील नाबाद ६० धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आता झिम्बाब्वेसमोर २२० धावांचा मोठा डोंगर आहे. झिम्बाब्वेने याआधी कधीही २०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केलेला नाही. यामुळे या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता जास्त मानली जात आहे. (IND VS ZIM)

 
View this post on Instagram
 

A post shared by Team India (@indiancricketteam)

 

झिम्बाब्वेच्या ब्लेसिंह मुझारबानीने भारताला पहिला झटका दिला होता. त्याने दुसर्‍या षटकात अभिषेक शर्माला बाद करत भारताला पहिला दणका दिला. अभिषेकने ८ चेंडूंम्ध्ये फक्त आठ धावा केल्या आहेत. त्यानंतर वैभवही नऊ चेंडूंमध्ये २० धावा करत बाद झाला आहे. झिम्बाब्वेच्या रिचर्ड नगारावने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर वैभवला बाद करत भारताच्या अडचणीत भर टाकली होती. भारताने या सामन्यासाठी आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे. यश ठाकूरला पदर्पणाची संधी देण्यात आली आहे. तर अशोक शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता, दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

 
 
View this post on Instagram
 

A post shared by Team India (@indiancricketteam)

 

टी-२० मालिकेसाठी भारत आणि झिम्बाब्वेचे संघ

भारतीय संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, सुर्यांश शेडगे, हर्ष दुबे, प्रभासिमरन सिंह, प्रभासिमरन सिंग.

झिम्बाब्वे संघ: ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), बेन कुरन, डिओन मायर्स, सिकंदर रझा (क), रायन बर्ल, वेस्ली माधेवेरे, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्यामुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तफादझ्वा त्सिगा, तफादझ्वा त्सिगा, वेलेंटाका, इनोसेंट्का.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >