Saturday, July 18, 2026

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या धडक कारवाईचे महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांनी कौतुक केले असून त्यांनी मुंबईत ज्याप्रकारे हॉटेल्स (Hotels), डेरी (Dairy) आणि इतर खाद्यपदार्थांची दुकाने जिथे भेसळीचे प्रकार घडकीस आणण्याच्यादृष्टीकोनातून महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने कारवाई करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यासाठी महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या अनुषंगाने भेसळयुक्त पदार्थांना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहिम राबवली जाईल असेही महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरा धाडसत्र सुरु असून राज्यातील विविध हॉटेल्स, दुध संकलन केंद्र, औषध कंपन्या, मेडिकल शॉप्स (Medical Shops), मसाल्याची दुकाने, सौदय प्रसादनाची दुकानांसह इतर खाद्यपदार्थांची दुकाने यावर धाड घालून भेसळीचे प्रकरणे उघडकीस आणली आहे. मुंढे यांच्या या कारवाईचे महापौर रितू तावडे यांनी कौतूक केले असून मुंबईमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या हॉटेल्स, डेरी तसेच इतर खानपास सेवांना परवाने दिले जातात,त्या त्या ठिकाणे भेसळीचे प्रकार होत असतील तर त्यांचे परवाने रद्द केले जातील असे स्पष्ट करत आता विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील हॉटेल्स, डेरी व इतर खानपान सेवांच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईच्या अनुषंगाने विशेष मोहिम राबवून तेथील भेसळीचे प्रकार उघडकीस आणून त्यांचे परवाने रद्द केले जातील तसेच अन्न व औषध प्रशासनाने ज्या ज्या आस्थापनांमधील भेसळीची प्रकरणे समोर आणली असतील तर त्यांचेही परवाने रद्द करावे अशाप्रकारचे निर्देश दिले जातील असेही महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा