सार्वजनिक वाहतूक दिवसानिमित्त अॅक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी बीकेसी मध्ये मोफत फीडर बस सेवा
मुंबई: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच WRI इंडिया आणि BKCMoves यांच्या सहकार्याने, ३ जुलै २०२६ रोजी बीकेसी मेट्रो स्थानकावर ‘सार्वजनिक वाहतूक दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत अॅक्वा लाईन (मेट्रो मार्गिका-३) प्रवाशांसाठी शेवटच्या टप्प्यातील (लास्ट-माईल) प्रवास अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने Cityflo तर्फे बीकेसी परिसरात मोफत फीडर बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना बीकेसी मेट्रो स्थानकापासून बीकेसीमधील प्रमुख ठिकाणी विनामूल्य प्रवास करता येणार आहे.
बंगळुरूमधील धक्कादायक घटना, डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल बंगळुरू : बंगळुरूमधील (Bengaluru) एका डेकेअर सेंटरमधून (Day Care Center) ...
अॅक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी प्रथम आणि शेवटच्या टप्प्यातील प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी बीकेसी मेट्रो स्थानकाच्या प्रवेश/निर्गमन द्वार A1 आणि A2 येथून Cityflo ची फीडर बस सेवा उपलब्ध आहे. या उपक्रमांतर्गत बीकेसी परिसरात सिटी फ्लो च्या बस सेवा पूर्णपणे मोफत चालविण्यात येणार आहेत. या फीडर बसद्वारे प्रवाशांना जिओ वर्ल्ड प्लाझा, वन बीकेसी, जेटवन एमएमआरडीए, कलानगर, बीडीबी गेट क्रमांक ७, आयसीआयसीआय बस स्टॉप आणि क्रेसेन्झो यांसह बीकेसीमधील विविध महत्त्वाच्या ठिकाणी विनामूल्य प्रवास करता येईल. ही फीडर बस सेवा बीकेसी परिसरातील पुढील प्रवास अधिक जलद, सुलभ आणि अखंड करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
मुंबईतील प्रमुख व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे -कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात दररोज हजारो कर्मचारी आणि नागरिक ये-जा करतात. अॅक्वा लाईन (मेट्रो मार्गिका-३) सुरू झाल्यानंतर बीकेसी मध्ये प्रवाशांना सार्वजनिक वाहतूकीचा अधिक गतिमान आणि सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे. अॅक्वा लाईन मुळे आरे जेव्हीएलआर ते कफ परेड दरम्यान जलद आणि आरामदायी प्रवास करणे शक्य झाले आहे . तसेच, मरोळ नाका (मेट्रो मार्गिका-१), सीएसएमटी, चर्चगेट, दादर, ग्रँट रोड, महालक्ष्मी आणि माहीम या उपनगरी रेल्वे स्थानकांशी महत्त्वाचे इंटरचेंज उपलब्ध आहेत. याशिवाय, पादचारी पुलाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-२ (CSMIA-T2) हे मेट्रो स्थानकाशी जोडले गेले आहे.
शिंदेंचे विधान परिषदेतील बळ वाढले; विदर्भातील राजकीय समीकरणांवर होणार परिणाम मुंबई : विरोधकांना एकामागून एक धक्के देत सत्ताधारी शिवसेनेने विधान ...
‘सार्वजनिक वाहतूक दिवस’ या उपक्रमाचा उद्देश एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापराला प्रोत्साहन देणे, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे तसेच अधिकाधिक नागरिकांना शाश्वत आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.(समाप्त)






