कारणे दाखवा नोटीस जारी; शिवसेनेच्या वर्धापनदिनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई : उबाठाच्या ६ बंडखोर खासदारांपैकी दोघेजण माघारी फिरतील, असा दावा केला जात असतानाच, सर्व बंडोबांनी व्हीप झुगारत गुरुवारी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे उबाठामधील फुटीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. या सर्व बंडखोरांना उबाठाने 'कारणे दाखवा नोटीस' जारी केली असून, त्यांना उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. दुसरीकडे, हे सर्व बंडखोर दिल्ली-जयपूर वारी करून मुंबईत दाखल होणार आहेत. गोरेगावच्या 'वेस्टीन हॉटेल'मध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली असून, शुक्रवारी नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.(FIFA WORLDCUP 2026)
स्टील उत्पादन निर्यातदार म्हणून भारताला पुढे आणण्याचे उद्दिष्ट केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली ...
संसदेतील उबाठा गटाच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत हे चारच खासदार उपस्थित होते. व्हीप बजावूनही ६ खासदारांनी बैठकीकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्यात संजय जाधव (परभणी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), संजय दिना पाटील (मुंबई ईशान्य), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) यांचा समावेश आहे. "व्हीप बजावूनही बैठकीला गैरहजर राहणे हा पक्षद्रोह आहे. त्यामुळे या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. ७ दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल," असा इशारा अरविंद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिला.
मेक्सिको सिटी — २०२२ च्या कतार विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर, कोलंबिया संघाने पुन्हा एकदा फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर दिमाखात पुनरागमन केले आहे. ...
या बंडखोर खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी उबाठा गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कायदेशीर दाद मागणार आहे. यासाठी त्यांनी शरद यादव यांच्यावरील कारवाईचा दाखला दिला आहे. शरद यादव यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर भाषण केले होते, तेव्हा पक्षाच्या तक्रारीवरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. "जर या सहा जणांनी वेगळा गट स्थापन केला असेल, तर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेले पत्र जाहीर करावे. चोरी करणारे आपली चोरी का लपवत आहेत?" असा सवाल सावंत यांनी केला.(FIFA WORLDCUP 2026)
गोरेगावच्या 'वेस्टीन हॉटेल'मध्ये सोय या सर्व घडामोडी सुरू असताना बंडखोर खासदार नेमके कुठे आहेत, यावरून गुरुवारी दिवसभर तर्कवितर्क सुरू होते. उबाठा खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता की, या ६ खासदारांचे मनपरिवर्तन रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ३० मिनिटांच्या 'कॉन्फरन्स कॉल'वर चर्चा झाल्यानंतर त्यांना दिल्लीतून राजस्थानच्या जयपूरला हलवण्यात आले होते. आता हे सर्व बंडखोर खासदार जयपूरहून मुंबईत दाखल होत आहेत. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या प्रसिद्ध 'वेस्टीन हॉटेल'मध्ये त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे.(FIFA WORLDCUP 2026)
मुंबई : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. पाणी साठवणीची क्षमता ...






