कल्याण: शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत हुंड्यासाठी विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्याबाबत निर्णय मुंबई : राज्यातील नद्या व नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामांना गती ...
१. किरकोळ वादातून पतीकडून पत्नीची हत्या
कल्याणमधील मलंग रोड (शंभर फुटी रोड) परिसरात १० जून रोजी ही दुर्दैवी घटना घडली. मुबीन खान आणि त्यांची पत्नी आयशाबानो यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. १० जूनला झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या मुबीन खानने आयशाबानोला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत आयशाबानो गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयशाबानो यांच्या बहिणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुबीन खान याला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय; मोजणीसाठी ९० आणि ३० दिवसांचा नवा 'डेडलाईन' फॉर्म्युला मुंबई : राज्य शासनाने जमीन मोजणीच्या शुल्क व वर्गीकरणात ...
२. हुंड्यासाठी विवाहितेचे टक्कल; पतीसह चौघांवर गुन्हा
कल्याणमधील वालधुनी परिसरात हुंड्यासाठी एका विवाहितेचा अमानुष छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या मंडळींनी विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून पीडितेने कशीबशी सासरच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि आपल्या माहेरी आश्रय घेतला. सध्या पीडितेवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
Nashik : नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. सटाणा तालुक्यातील लखमापूर गावची कन्या भाविका अहिरे हिची भारतीय महिला १९ वर्षांखालील क्रिकेट ...
गुन्हा दाखल झालेले आरोपी: पीडितेने केलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
समीर अन्सारी (पती)
-
हिना अन्सारी (नणंद)
-
शहनाज अन्सारी (सासू)
-
सासूची मोठी बहीण
या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत असून, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.






