Sangamner Crime : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्तधाम आश्रमाचे चालक राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) बाबा याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर, त्याच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने त्याला तब्बल ४२ दिवसांनी जामीन मंजूर केला आहे. गडगे बाबा याला जामीन मिळाल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत गडगेविरुद्ध आणखी गंभीर गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
न्यायालयात जोरदार युक्तिवाद
न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. श्रीप्रसाद कानडे यांनी गडगेच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. ॲड. कानडे यांनी सांगितले की, राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) बाबा यांच्यावर जे भोंदूगिरीचे किंवा जादूटोण्याचे आरोप करण्यात आले होते, ते कायदेशीरदृष्ट्या त्यांच्यावर लागू होत नाहीत. बाबांनी स्वतःकडे कोणतीही दैवी शक्ती असल्याचा किंवा त्या माध्यमातून दुर्मिळ आजार बरे करत असल्याचा दावा कधीही केलेला नाही. आश्रमात येणाऱ्या भाविकांना केवळ मानसिक शांततेसाठी तिथे येण्यास सांगितले जाते.
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मविआला मोठा धक्का मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम ऐन रंगात आलेला असतानाच महाविकास आघाडीला अहिल्यानगर ...
ॲड. कानडे यांनी स्पष्ट केले की, "आम्ही आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हेच सांगतो की, जर तुम्हाला शारीरिक व्याधी किंवा आजार असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याकडूनच वैद्यकीय उपचार घ्या." दत्तधाम आश्रमात केवळ ध्यानधारणा केली जाते. हिंदू धर्मातील पवित्र परंपरेनुसार तिथे हवन विधी केला जातो, जो प्रत्येक सनातन धर्मियांना करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यात कोणताही जादूटोणा किंवा अंधश्रद्धा नाही. न्यायालयाने जामीन मंजूर करताना नेहमीच्या नियमित कायदेशीर अटी व शर्ती लागू केल्या आहेत. "आम्ही न्यायालयाच्या सर्व अटींचे पूर्णपणे पालन करू. आमचा न्यायदेवतेवर आणि न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे," असे ॲड. कानडे यांनी शेवटी सांगितले.
या प्रकरणात मुख्य युक्तिवाद करण्यासाठी राजेंद्र गडगे बाबा यांच्या वतीने वरिष्ठ विधीज्ञ ॲड. सुनिता बन्सल, ॲड. श्रीप्रसाद कानडे, ॲड. मंगेश टेकोडे, आणि ॲड. नितीश चोरमले यांनी काम पाहिले. तसेच ॲड. संपत पवार आणि ॲड. स्वाती सांगळे यांनी त्यांना कायदेशीर सहकार्य केले. दरम्यान तपासी अधिकारी प्रवीण साळुंखे यांना या प्रकरणी पुरवणी जबाब घेण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या संथ कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, या गुन्ह्यात इतर सहकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांनाही आरोपी करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांवर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कथित कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्याचा दावा करण्यात आला ...
दत्तधाममध्ये चालणाऱ्या इतर बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश
राजेंद्र गडगेला तूर्तास जामीन मिळाला असला, तरी त्याचे तुरुंगाबाहेरचे दिवस फार काळ टिकण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, दत्तधाममध्ये चालणाऱ्या इतर बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश होत असून, येत्या ४ ते ५ दिवसांत गडगेविरोधात 'गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार' (PCPNDT Act) आणखी एक नवीन गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात गडगेच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे चिन्हे आहेत.
अहिल्यानगर : पाथर्डी ( Pathardi ) तालुक्यातील एका गावात सुरू असलेल्या धार्मिक सप्ताहादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. धार्मिक सप्ताह कार्यक्रमातच १४ ...
डॉ. मोहन पुरी अद्यापही फरार
या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा डॉ. मोहन पुरी हा गुन्हा दाखल झाल्यापासून अद्याप फरार आहे. राजेंद्र गडगे याने भाविकांची फसवणूक करून गोळा केलेल्या अफाट संपत्तीच्या आणि आर्थिक व्यवहारांचा तपास पोलिसांनी अद्याप केलेला नाही. अशा गंभीर आणि सामाजिक स्वरूपाच्या गुन्ह्यात तपास पूर्ण होण्याआधीच आरोपीला जामीन मिळणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
ॲड. रंजना गवांदे (राज्य सचिव: अंधश्रद्धा निर्मूलन समिती)






