Friday, May 29, 2026

Kalayn : कल्याणमध्ये अल्पवहीन मुलांनी केला जीवघेणा स्टंट

Kalayn : कल्याणमध्ये अल्पवहीन मुलांनी केला जीवघेणा स्टंट

कल्याण : कल्याणमधील खडकपाडा परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रस्त्यावर एक स्कुटी दिसत आहे. या स्कुटीवर चार अल्पवयीन भरधाव वेगाने प्रवास करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओ कारवाईची मागणी सोशल मीडियातून जोर धरू लागली आहे.

मुलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. पण व्हिडीओत दिसत असलेला प्रकार बघता संबंधित मुलांना आणि त्यांच्या पालकांना चुकीची जाणीवच नसावी, असे वाटते. यामुळे कारवाई व्हायलाच हवी अशी अनेकांची मागणी आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक अल्पवयीन मुलगा स्कुटी चालवत असल्याचे दिसत आहे. त्याच्या सोबत त्याचे तीन मित्र मागे बसले असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देत पुढे जाताना दिसत आहे. स्कुटीवर बसलेल्यांपैकी एकाही मुलाने हेल्मेट घातले नसल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. मुलांची कृती त्यांच्या जीवासाठी प्रचंड धोकादायक अशीच आहे. या परिस्थितीची जाणीव नसेल तर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून ही जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. अल्पवयीन मुलांनी स्कुटी चालवणे हे पादचाऱ्यांसाठीही धोक्याचे ठरू शकते. ही बाब पण गांभिर्याने घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार याआधीही याच परिसरात घडला आहे. अनेकदा ही मुलं वेगमर्यादा न पाळता बेजबाबदारपणे गाड्या चालवताना आढळतात. मात्र अल्पवयीन मुलांकडे पालक वाहन चालवण्यासाठी चावी का देतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलांनी विनाहेल्मेट स्कुटी चालवल्याप्रकरणी संबंधित मुले आणि त्यांचे पालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अल्पवयीन मुलांमुळे अपघात झाला असता अथवा मुलांनाच काही झाले असते तर जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन कारवाई सुरू केल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >