आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे थायरॉईडच्या समस्येची सुरुवात असू शकते. थायरॉईडचे आजार हे हल्ली मोठ्या प्रमाणात आढळून येत असले तरी अनेकजण अजूनही या आजाराबद्दल पुरेशी माहिती ठेवत नाहीत. त्यामुळे योग्य वेळी निदान आणि उपचार होण्यास उशीर होतो.
मॉस्को : रशियाने शनिवारी रात्रभर युक्रेनवर जोरदार हल्ले करत हायपरसॉनिक ‘ओरेश्निक’सह चार प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला. मॉस्कोकडून ...
ही ग्रंथी प्रामुख्याने थायरॉक्सिन (T4), ट्रायआयोडोथायरोनिन (T3) आणि कॅल्सीटोनिन हे हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स शरीरातील ऊर्जा निर्मिती वाढवण्यास आणि विविध अवयवांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास शरीराचे संतुलन बिघडू शकते आणि विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
LSG VS PBKS : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यादरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
थायरॉईडच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम हे प्रकार आढळतात. हायपोथायरॉईडीझममध्ये हार्मोन्सचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे सतत थकवा जाणवणे, वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, नैराश्य आणि झोप अधिक येणे अशी लक्षणे दिसू शकतात. तर हायपरथायरॉईडीझममध्ये हार्मोन्सचे प्रमाण वाढल्याने वजन झपाट्याने कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड होणे, घाम जास्त येणे आणि अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे दिसतात.
आरोग्यदायी जीवनशैली आणि वेळेवर उपचार यामुळे थायरॉईडच्या समस्या नियंत्रणात ठेवता येतात. त्यामुळे शरीरात होणारे बदल दुर्लक्षित न करता त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.






