वरिष्ठ नेत्यांमधील विसंवाद दूर करणार; आमदारांशी साधणार व्यक्तिगत संपर्क
मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेले नाराजीनाट्य आणि आमदारांमधील वाढती अस्वस्थता दूर करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार अखेर ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांमधील घोळ आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांना साईडलाईन केल्याच्या चर्चेमुळे पक्षात मोठे बंड होण्याची चिन्हे आहेत. हे नाराजीनाट्य वेळेत शमवण्यासाठी उपमुMumख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पक्षाच्या कोअर कमिटीची आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांमधील विसंवाद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, सुनेत्रा पवार स्वतः सर्व आमदारांशी व्यक्तिगत संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.
देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाने (NEET Paper Leak Case) आता आणखी गंभीर वळण घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. लातूरमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. ...
अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षाची सर्व सूत्रे हाती घेतली असली, तरी निर्णय प्रक्रियेवरून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगासोबत सुरू असलेला पत्रप्रपंच थेट पार्थ पवार हाताळत असल्याची चर्चा आमदारांमध्ये सुरू आहे. "सुनेत्रा वहिनींची सही आणि पार्थ पवारांची शाई" अशा पद्धतीने सध्या पक्षाचा कारभार सुरू असून सुनेत्रा पवार मुलाला रोखू शकत नसल्याने पक्षात संभ्रम वाढला आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांसारखे दिल्ली दरबारी वजन असलेले नेते जर सोबत नसतील, तर पक्षाचे भविष्यच अंधारात येईल, अशी भीती आमदारांना सतावत आहे.
जम्मू काश्मीर : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांच्या विळख्यात (Jammu Kashmir Drug Case) अडकत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ...
- राष्ट्रवादीत सध्या निवडणूक आयोगाला पाठवलेल्या दोन पत्रांवरून तीव्र असंतोष आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, तेव्हा प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष घोषित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर १० मार्च आणि २९ एप्रिल रोजी सुनेत्रा पवारांच्या सहीने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या दोन्ही पत्रांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या पदांचा उल्लेखच टाळण्यात आला.'
- "मागील पत्र रद्द करून हेच पत्र ग्राह्य धरावे," असा स्पष्ट उल्लेख या पत्रांमध्ये असल्याने प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना पदावरून मुक्त करण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीचे व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर फिरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.






