राजस्थान : राजस्थानात चित्तोडगड जिल्ह्यातील मेवाडचे प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात जयपूर येथील एका भाविक कुटुंबाने भगवान सावळिया सेठ या नावाने प्रसिद्ध असलेल्या भगवान श्रीकृष्णाला सुमारे १३७ ग्रॅम सोन्याची बासरी अर्पण केली आहे. सध्याच्या सोन्याच्या दरानुसार या बासरीची किंमत साधारण २० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. या भाविक कुटुंबाची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे देवाबद्दल कृतज्ञता आणि अढळ श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ही विशेष भेट अर्पण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(Lord Krishna)
अमरावती : अमरावतीतील श्री हनुमान गढी येथे शनिवारी हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी ...
मंदिरात दर्शन आणि पूजाअर्चा केल्यानंतर भाविकाने ठरलेल्या प्रक्रियेनुसार मंदिर प्रशासनाकडे भेट कक्षात ही सुवर्ण बासरी सुपूर्द केली. मंदिर मंडळाने नियमांनुसार ही भेट स्वीकारून त्याची पावती जारी केली. परंपरेनुसार, भाविकाला शाल देऊन सन्मानित करण्यात आले आणि देवाचा प्रसाद व प्रतिमा भेट देण्यात आली. धार्मिक मान्यतांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बासरीचे विशेष महत्त्व मानले जाते. बासरी हे प्रेम, भक्ती आणि शांततेचे प्रतीक मानली जाते. याच कारणामुळे ही सुवर्ण बासरी केवळ एक मौल्यवान भेटवस्तू नसून, भाविकाच्या गाढ आस्थेचे आणि विश्वासाचे प्रतीक बनली आहे. राजस्थानचे हे सावळिया सेठ मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून, येथे त्यांची व्यापार आणि धनाचे देव म्हणून पूजा केली जाते. याच कारणामुळे त्यांना 'सेठ' म्हटले जाते. येथील अनेक व्यापारी देवाचा आपल्या व्यवसायात भागीदार म्हणून समावेश करतात आणि आपल्या नफ्यामध्ये त्यांना रीतसर वाटा देतात. त्यानंतर या नफ्याचा एक हिस्सा मंदिरात दान केला जातो.






