महापालिका प्रमुख रुग्णालयांमधील सुविधांचा घेतला आढावा
मुंबई : महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील विविध सुविधांबाबत महापालिका आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदीर्गे यांनी आढावा घेतला. विनाखर्च चांगल्या सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत कशा पोहोचवता येईल या उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांना सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे निर्देश देत यासाठी प्रयत्न रुग्णालयात प्रयत्न करावेत आणि यासाठी प्रत्येक अधिष्ठाता आणि अधिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे अशाप्रकारच्या सूचनाही भांदिर्गे यांनी केल्या.
मुंबई : देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवार, १५ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ३ ...
मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठातांसोबत आरोग्य सेवांबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे जी यांनी बोलावलेल्या या बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे जी, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.माला दीक्षित सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (के. ई. एम.) अधिष्ठाता डॉ. हरिष पाठक जी, बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता आणि संचालक, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये डॉ. शैलेश मोहिते जी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालय अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) छाया शिंदे जी, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे जीही उपस्थित होते.
मुंबई : देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवार, १५ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ३ ...






