 |
रखडलेली कामे मार्गस्थ होतील
मेष : शिक्षण, संस्था, नोकरी-व्यवसाय, यात अनुकूल काळ आहे.ज्या व्यक्तीचा खूप मोठ्या कालावधी मध्ये अपेक्षित ठिकाणी बदली झाली नसेल तर आता होण्याची शक्यता आहे .नवीन कलाकारांना संधी प्राप्त होणार आहे चांगल्या कलाकारांचे सिने मे बॉक्स ऑफिस वर यशस्वी होणार आहेत. स्टॉक मार्केट मध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू नये अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात झालेली चहाच्या पेल्यातील वादळे आता संपणार आहेत. अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे. आपल्या मनाप्रमाणे कार्यभाग साधणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होणार आहे. जोडीदार आपल्याला समजून घेणार आहे.जमीन मालमत्ते संबंधित रखडलेली कामे मार्गस्थ होतील विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवता येईल. उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. प्रेमात यश मिळेल. व्यवसाय धंदा या मधील परिस्थिती समाधान कारक राहून उलाढाल वाढेल.
|
 |
भौतिक जीवन सुखमय होणार आहे
वृषभ : शुभ ग्रहांची मोठ्याप्रमाणावर साथ लाभणार आहे त्यामुळे भौतिक जीवन सुखमय होणार आहे पैशाची आवक वाढल्यामुळे खरेदी होईल घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. अशुभ ग्रहांच्या गोचर भ्रमणामुळे कमी वेळात जास्त पैसा मिळविण्याची इच्छा होऊ शकते. शॉर्टकटने पैसे कमवू नका. त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतील.सट्टा किंवा लॉटरी मध्ये पैसे लावल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात कुठल्याही प्रकारची वादळे येऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना पण मनोरंजन करावेसे . वाटेल.जुन्या मित्र-मैत्रिणींशी गाठीभेटी होतील त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. महिलांना खरेदीचा आनंद लुटता येईल. आनंदाचे वातावरण असणार आहे.कोर्ट विषयक कामे होतील तसेच वडिलोपार्जित संपत्ती विषयी असलेले वाद-विवाद मिथुन सर्वमान्य तोडगा निघेल अर्थ लाभाची शक्यता. राहत्या घराच्या सुशोभीकरणासाठी मनसोक्त खर्च कराल. जीवन साथी आपल्याला अपेक्षित साथ देईल त्याच प्रमाणे इतरत्र सहकार्य मिळेल.
|
 |
इच्छा पूर्ण होतील
मिथुन : नोकरी व्यवसायात ताण निर्माण होणार आहे. जास्त काम आणि कमी पैसे, आउटपुट ही कमी मिळणार आहे.उत्पन्नापेक्षा खर्च वाढणार असल्यामुळे बचतीचे बजेट गडबड होऊन जाणार आहे.व्यापार-व्यवसायात दुकानाचे किंवा शोरूमचे रेंट अचानक वाढल्यामुळे अधिक भार पडल्यामुळे ,आर्थिक दृष्ट्या ताण तणाव निर्माण होणारआहे संयम बाळगा. कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच तुमचे ध्येय पूर्ण होईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा.भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. व्यवहार लक्षात ठेवूनच निर्णय घ्या. कौटुंबिक बाबतीत अनुकूल काळ .कुटुंबातील तरुण-तरुणींच्या समस्या संपुष्टात येऊन नोकरी विषयक प्रश्न संपुष्टात येतील. त्याच प्रमाणे व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्व सामान्य राहील काला नुसार व्यवसाय धंद्यात काही बदल करणे आवश्यक ठरणार आहे भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल तसेच कुटुंबातील ज्येष्ठांची मदत मिळेल.
|
 |
महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतो
कर्क : आपल्या नोकरी आणि व्यवसायात किंवा करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतो. आपले प्रत्येक निर्णय आपल्या बुद्धिचातुर्याने आणि विवेकाने घ्यावे, तरच आपल्या जबाबदार्या तुम्ही पूर्ण करू शकाल. बेरोजगार व्यक्तींना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याची संभावना आहेजुनी नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असाल तर नवीन नोकरी शोधण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक राहील त्याच प्रमाणे बदलीची शक्यता.. काही व्यक्तींना मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करायची असल्यास थोडा काळ वाट बघा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी मेडिटेशन चा आधार घ्यावा. त्यामुळे आपल्याला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. कुठल्या एखाद्या गोष्टींमध्ये चांगली कलाकारी दाखवाल. जे विद्यार्थी मेडिकल ला आहे त्यांना विशेष यश मिळणार आहे वेळेचे नियोजन उपयोगी पडून कुसंगत टाळणे हितकारक ठरेल.
|
 |
आर्थिक लाभ होतील
सिंह : व्यापार व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगले बदल होतील. व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. भागीदारीमध्ये किंवा नोकरी व व्यवसायात आपला जनसंपर्क खूप वाढणार आहे. मात्र सर्व दृष्टिकोनातून आपल्याला लक्ष देऊन काम करावे लागेल.इतरांवर ती अवलंबून राहणे महागात पडू शकते स्वतःची कामे स्वतः करा आजचे काम उद्यावर ढकलू नका आळस झटका. यश मिळेल राजकीय क्षेत्रातील जातकांचा जनसंपर्क वाढेल केलेल्या कार्याची प्रशंसा होईल एखादी महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल. घाईगडबडीने नुकसान होऊ शकते, इम्पोर्ट एक्सपोर्ट च्या व्यवसाय मध्ये फायदा होऊ शकतो. कमिशन त्यासारख्या व्यवसायात पण आर्थिक लाभ होतील. प्रेमसंबंधात नवीन आशा उत्पन्न होतील.सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो प्रेमिकांना सफलता. भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात मिळतील भागीदाराची सलोख्याचे संबंध राहतील
|
 |
स्थिरता मिळणार आहे
कन्या : सदरचे कालावधीमध्ये आपणास निश्चितच स्थिरता मिळणार आहे. चहूकडून आपल्याला चांगल्या बातम्या समजतील त्यामुळे मनामध्ये उत्साह व आनंद असेल. ज्या लोकांना परदेशगमनाची अपेक्षा आहे त्यांना परदेशगमन निश्चित होईल. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी ज्या परीक्षा दिली आहेत त्याचे रिझल्ट चांगले येतील. कोर्टकचेरीची काही कामे चालली असल्यास ते निकाल आपल्या बाजूने लागतील.शेजारी किंवा जोडीदार यांच्याकडून या तक्रारी निर्माण होतील मनस्ताप होऊ शकतो सबुरीने निर्णय घ्या .वाद-विवाद वाढवू नका अपशब्द वापरू नका. आपल्या वर्तणुकीवर अथवा आपल्या बोलण्यावर ती नियंत्रण आवश्यक आहे तसेच वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा कोणतेही आर्थिक व्यवहार करताना डोके शांत ठेवून व्यवहार करणे हितकारक ठरेल संपूर्ण माहिती घेऊन मगच व्यवहार करा. अतिउत्साह टाळा रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मुलांच्या कडून सुखद वार्ता मिळतील.
|
 |
सकारात्मक बदल होणार आहेत
तूळ : आपल्या मित्रांच्या मदतीने थांबलेला पैसा पुन्हा तुम्हाला प्राप्त होईल. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेतत्यांना चांगल्या नोकरी चालून येतील. आर्थिक बाबतीमध्ये चांगले आणि सकारात्मक बदल होणार आहेत कौटुंबिक जीवनात नाती मजबूत होतील. पण सासू सुने मध्येवाद जास्त वाढू देऊ नका.विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात पुढे जात असतील पण इंजिनिअर किंवा टेक्निकल साईड मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र जास्त कष्ट करावे लागणार आहेत कॉन्सन्ट्रेशन कडे लक्ष देणे.आपण भाग्या पेक्षा कर्म करण्याला महत्त्व दिले तर यश आपलेच आहे.ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे त्यांना योग्य जीवनसाथी मिळेल.व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसुल होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील परंतु या या पैशांची वसुली करताना थोडे संयमाने घ्यावे लागेल वाद-विवाद व भांडणे नकोत. कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरी विषयक असलेले प्रश्न मिटतील नोकरी मिळेल.
|
 |
कौटुंबिक समस्या सुटतील
वृश्चिक : नोकरीमध्ये बदल होतील.स्थान बदलाचे योग आहेत नव्या नोकरी विषयी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. धार्मिक क्षेत्रात किंवा अध्यात्मामध्ये आपली आवड निर्माण होईल.या कालावधीमध्ये आपल्याकडे ज्या काम करणाऱ्या व्यक्ती होत्या, त्या सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला नवीन कामगारांची भरती करावी लागेल .आपल्या व्यवसायामध्ये अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी शांततापूर्वक मार्ग काढावा लागेल ,पूर्ण विचारांती निर्णय घ्या तसेच व्यवसायिक अचानक अडचणी निर्माण झाल्यामुळे आर्थिक मदतीची गरज भासू शकते परंतु मदत मिळू शकेल .नोकरी व्यवसायामध्ये पुरुषांनी स्त्रियां पासून लांबच राहावेविनयशीलता राखावी. सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. घरामध्ये जे गढूळ लेले वातावरण असेल,त्यामध्ये बहिणीची मध्यस्ती योग्य राहील. कौटुंबिक समस्या सुटतील.
|
 |
प्रवासाचे परिणाम चांगले मिळतील
धनु : प्रॉपर्टी डीलर, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, यांच्याशी संबंधित असलेले व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आपल्या करिअर साठी हा खूपच चांगला योग आहे. जे जातक नोकरीच्या शोधात होते त्यांना उत्तम नोकरी मिळेल. ज्यांना सरकारी नोकरीत बदली हवी आहे त्यांना बदली मिळेल, बदली इच्छित ठिकाणी होईल .नोकरी व्यवसायासंबंधी लांबचे प्रवास होवु शकतात. या प्रवासाचे परिणाम चांगले मिळतील.नवीन संधी प्राप्त होतील. मोठ्या ठिकाणी मोठ्या जागेवर काम करावयास मिळेल.दीर्घकाळ रखडलेली अथवा प्रलंबित राहिलेली जमीन जुमला मालमत्तेसंबंधी ची वादग्रस्त प्रकरणे मार्गी लागून पूर्णत्वाकडे जातील यामध्ये समाजातील प्रभावशाली व्यक्तींचा प्रभाव राहील कुटुंबातील ज्येष्ठांची मदत मिळू शकते विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवता येईल उच्च शिक्षण असे नियोजन करता येईल. कौटुंबिक वातावरण सर्व सामान्य राहील मात्र आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा तसेच इतरांच्या म्हणण्याला उचित प्राधान्य देणे हितकारक ठरेल.
|
 |
आर्थिक स्थिती मध्ये चढ-उतार
मकर : या सप्ताहात काही योगामुळे आपल्या. आर्थिक स्थिती मध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे .काही अंशी आर्थिक स्थिती चिंताजनक असू शकते. पण लवकरच आपली आर्थिक स्थिती चांगली होईल. घरामध्ये कुटुंबा मध्ये सुरुवातीपासून चाललेले वाद-विवाद कमी होतील. घरामध्ये आनंदाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करणे जरुरी आहे. प्रेम प्रकरणना साठी हा कालावधी चांगला आहे. जर आपल्याला कोणाला प्रपोज करायचा असल्यास तुम्ही या कालावधीमध्ये करू शकता. यासाठी हा कालावधी आपणास अनुकूल आहे. आपण आपल्या प्रियजनान बरोबर सहलीला जाऊ शकता. हा कालावधी अतिशय आनंददायी व आठवणीत राहण्यासारखा असणार आहे. जर कुठल्या नातेसंबंध वाढवायचे असतील तर हाच कालावधी पण आपल्याला या साठी चांगला आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, गोड बोलूनच आपल्याला काम करून घ्यावे लागणार आहे
|
 |
कार्यक्षेत्र विस्तार होईल
कुंभ : आपल्या जन्मगावी किंवा जन्म गावापासून दूर दोन्ही ठिकाणी कुठेही असाल तेथे आपणास चांगले लाभ होणार आहे. मागे काही योजना आपण बनवल्या होत्या त्यावेळी त्याचा फायदा झाला नाही, पण आता त्याचे नियोजन करून त्याचे आयोजन करा. त्यात नक्की फायदा होईल. या योजना कार्यान्वित होतील.आपले कार्यक्षेत्र विस्तार करण्याची चांगली संधी आहे .नवीन नोकरीची संधी मिळेल.आपल्याला नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तरी हा कालावधी आपणास उत्तम आहे. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये एखादा सन्मान आपणास प्राप्त होऊ शकतो.सामाजिक तसेच धार्मिक कार्यामध्ये रस घेऊन सक्रिय योगदान द्याल. इम्पोर्ट एक्सपोर्ट च्या व्यवसायामध्ये सुद्धा आपणास यश येईल. त्यामध्ये परदेशातून आपणास चांगले फायदे मिळू शकतात
|
 |
कार्य सहजतेने पूर्ण होईल
मीन : आपण आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवताना आपल्याला पुष्कळ ऊर्जा व चैतन्य जाणवेल.प्रेमिकांना मात्र आपल्या भावनांवर संयम राखणे आवश्यक आहे अन्यथा दोघांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे मतभेद होऊ शकतात.व्यापार व्यवसाय नोकरी करणाऱ्यांना हा कालावधी अतिशय उत्तम आहे. कलाकारांना नवीन संधी मिळतील लेखक आणि कविता करणाऱ्यांना उत्तम कालावधी आहे.आपले प्रत्येक कार्य सहजतेने पूर्ण होईल पूर्वी राहिलेले पेंडिंग कामे पूर्ण करण्यासाठी, आपल्याला वरिष्ठांचा पण सहयोग मिळू शकतो.विद्यार्थ्यांना पालक व शिक्षक यांचे पूर्ण मार्गदर्शन लाभेल त्याचे फायदे विद्यार्थ्यांना होणार आहे, विद्यार्थी आपल्या क्षेत्रात यश मिळवतील |