Friday, May 8, 2026

Great Purge of 2026 : इन्स्टाग्रामच्या ‘ग्रेट पर्ज २०२६’मुळे खळबळ! विराट, प्रियांका, रोनाल्डोसह अनेक सेलिब्रिटींचे लाखो फॉलोअर्स गायब

Great Purge of 2026 : इन्स्टाग्रामच्या ‘ग्रेट पर्ज २०२६’मुळे खळबळ! विराट, प्रियांका, रोनाल्डोसह अनेक सेलिब्रिटींचे लाखो फॉलोअर्स गायब

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका रात्रीत मोठा बदल पाहायला मिळाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटी (Celebrities) आणि इन्फ्लुएंसर्सच्या (Influencers) अकाउंटवरील लाखो फॉलोअर्स (Followers) अचानक कमी झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया युजर्स (Social Media Users) या घटनेला आता 'Great Purge of 2026' असे म्हणत आहेत. या मोठ्या कारवाईचा फटका भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli), अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि फुटबॉल स्टार क्रिस्तियानो रोनाल्डोसह (Cristiano Ronaldo) अनेक जागतिक सेलिब्रिटींना बसला आहे.

इन्स्टाग्रामची (Instagram) मूळ कंपनी ‘मेटा’ने (Meta) प्लॅटफॉर्मवरील बनावट, निष्क्रिय आणि बॉट अकाऊंट्सविरोधात (Bot Account) मोठी मोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नसली, तरी काही तासांतच अनेक सेलिब्रिटींच्या फॉलोअर्समध्ये (Celebrities Followers) मोठी घट झाल्याचे दिसून आले. सोशल मीडिया (Social Media) अधिक पारदर्शक (Transperant), सुरक्षित (Safe) आणि विश्वासार्ह (Trustworthy) बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या कारवाईत अमेरिकन सोशलाईट आणि उद्योजिका काईली जेनरला (Kylie Jenner) सर्वाधिक फटका बसल्याची चर्चा आहे. तिचे तब्बल १४ मिलियन फॉलोअर्स (14 Million Followers) कमी झाल्याचे सांगितले जात आहे. तर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) जवळपास ८ मिलियन फॉलोअर्स (8 Million Followers) गायब झाले आहेत. त्याचबरोबर टेलर स्विफ्ट (Taylor Swift), जस्टिन बीबर (Justin Bieber) आणि एरियाना ग्रांडे (Ariana Grande) यांच्याही फॉलोअर्सच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.

भारतीय सेलिब्रिटींनाही या कारवाईचा मोठा फटका बसला आहे. विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्येही लक्षणीय घट दिसून आली आहे. केवळ वैयक्तिक सेलिब्रिटीच नव्हे, तर BTS (बीटीएस) आणि BLACKPINK (ब्लॅककपिंक) यांसारख्या लोकप्रिय के-पॉप ग्रुप्सच्या (K-Pop) अकाऊंट्सवरही या मोहिमेचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडिया तज्ज्ञांच्या मते, इन्स्टाग्रामने स्पॅम अ‍ॅक्टिव्हिटी (Spam Activity), फेक प्रोफाइल्स (Fake Profiles) आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे (Third Party Apps) कृत्रिमरित्या वाढवण्यात आलेले फॉलोअर्स हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. ‘फेक इंगेजमेंट’चा (Fake Engagement) बाजार रोखून केवळ अस्सल युजर्स प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहावेत, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

या मोहिमेमुळे इन्फ्लुएंसर मार्केटिंगच्या (Influencer Marketing) क्षेत्रातही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत फॉलोअर्सच्या आकड्यांवर चालणाऱ्या सोशल मीडिया विश्वात आता ‘रिअल ऑडियन्स’ (Real Audience) आणि ‘ऑर्गॅनिक इंगेजमेंट’ला (Organic Engagement) अधिक महत्त्व मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

‘ग्रेट पर्ज 2026’ मोहिमेमुळे सोशल मीडियावर जणू भूकंपच आला आहे. लाखो फॉलोअर्स एका झटक्यात कमी झाल्याने अनेक चाहतेही आश्चर्य व्यक्त करत आहेत. आता मेटाची ही कारवाई इथेच थांबणार की आणखी मोठ्या प्रमाणावर अकाऊंट्स हटवले जाणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >