चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे. ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती, असं चित्र समोर आलं आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) या विजयच्या पक्षाने दमदार कामगिरी करत बाजी मारली आहे. तामिळनाडूच्या राजकारणात TVK हा आता सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे.
पुणे: लोणावळा परिसरातील एका शेतकऱ्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना तब्बल २०० कोटी रुपयांच्या किंमतीची एक लाख सागवान झाडे ‘पारितोषिक’ म्हणून देण्याची ...
थलपती विजयचा TVK पक्ष १०५ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. मतदानानंतर जवळपास सर्व एक्झिट पोल्सनी द्रमुक (DMK)च्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र पूर्णपणे उलट झालं आहे. द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) हे दोन्ही पक्ष आता विरोधी पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत.
मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेला ऐतिहासिक विजय हा अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री ...
TVK च्या या प्रचंड यशामागे पक्षाचे संस्थापक विजय यांचा मोठा वाटा मानला जात आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. तब्बल २७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर त्यांनी पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. याच काळात अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबतचं त्यांचे कथित प्रेमसंबंधही चर्चेचा विषय झाले होते.
आजचा दिवस विजय आणि त्रिशा कृष्णन या दोघांसाठीही खास ठरला आहे. एका बाजूला विजय यांनी राजकारणात मोठं यश मिळवलं आहे, तर दुसऱ्या बाजूला आजच त्रिशा कृष्णनचा वाढदिवस आहे. त्यामुळे हा दुहेरी आनंदाचा क्षण मानला जात आहे.






