मुंबई : ऑपरेशन टायगर वरून उलटसुलट चर्चेला उधाण आले असताना एका भेटीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. उबाठाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या विधानपरिषदेतील आमदार चित्रा वाघ यांची भेट घेतली. प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपला आहे. विरोधकांकडे पुरेशी ताकद नसल्यामुळे प्रियांका चतुर्वेदी पुन्हा राज्यसभेवर गेलेल्या नाहीत. यामुळे उबाठाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी आता काय करणार असा प्रश्न निर्माण झाला असतानाच त्यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांची भेट घेतली आहे.
उबाठाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदींनी घेतली चित्रा वाघ यांची भेट . .#prahaarnewsline #ubatha #chitrawagh #priyanakachaturvedi pic.twitter.com/N0CgjRJSg7
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) April 13, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या ऐतिहासिक नारीशक्ती वंदन अधिनियमाला मिस्ड कॉल देऊन पाठिंबा देण्याच्या निमित्ताने प्रियांका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांची भेट घेतली. याच भेटीत त्यांनी मिस्ड कॉल देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या ऐतिहासिक नारीशक्ती वंदन अधिनियमाला पाठिंबा दिला. महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी पाठिंबा देण्याच्या निमित्ताने प्रियांका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती प्रियांका चतुर्वेदी यांनी मिस्ड कॉल दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. राजकीय वर्तुळात यावरून चर्चेला उधाण आले आहे.
देशाच्या संसदेने सप्टेंबर २०२३ मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक मंजूर केले. हे करताना महिलांचे आरक्षण नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचUनेशी जोडले होते. कोरोना संकटामुळे जनगणनेला विलंब झाल्याने २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात महिला आरक्षण लागू करण्यासाठी गुरुवार ते शनिवार, १६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात नवे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. नव्या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली तर संसदेतील महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. याचा थेट फायदा राजकीय क्षेत्रातील महिलांना होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांची भेट घेतली.






