Saturday, March 21, 2026

साप्ताहिक भविष्य, २२ ते २८ मार्च २०२६

साप्ताहिक भविष्य, २२ ते २८ मार्च २०२६

साप्ताहिक भविष्य, २२ ते २८ मार्च २०२६

समस्या सुटतील

मेष : धार्मिक प्रवासाच्या योजना आखाल. त्यासाठी खर्चात वाढ झालेली दिसेल. सर्व कुटुंबांचा सहभाग आनंद देणारा ठरेल. दानधर्मासाठी खर्च कराल. जोडीदाराच्या सहकार्यासाठी पूरक राहाल. उद्योग व्यवसायासाठी विशेष श्रम घेतल्यास नियोजन यशस्वी झालेले दिसेल. परदेश प्रवासाची संधी. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील तसेच कुटुंब व परिवारातील वातावरण सुखद राहील. आरोग्यविषयी फारशी चिंता नसेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होऊ शकतात. गूढ शास्त्राच्या अभ्यासात प्रगती साधाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. शुभ समाचार मिळतील. नव्या योजना अमलात आणू शकाल. जमीन-जुमला यांची प्रलंबित असलेली कामे मार्गावर येतील. काही कारणास्तव केलेले प्रवास सफल होतील. स्थायी संपत्तीच्या दृष्टिकोनातून काही बदल संभवता

अधिकार, प्रतिष्ठा, सन्मान मिळू शकतो

वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात पद, अधिकार, प्रतिष्ठा, सन्मान, प्रसिद्धी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. परोपकारी वृत्ती राहील. सर्वांना मदतीचा हात द्यावा. प्रसिद्धीचे योग आहेत. धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल. समाजातील सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. प्रसिद्धीचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळतील. नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. व्यवसाय-धंद्यात परदेशी संबंध येऊ शकतो. आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. घरातील वातावरण सुखद राहील.

उन्नतीसाठी अनुकूल काळ

मिथुन : सध्याचे ग्रहमान प्रगतीसाठी तसेच उन्नतीसाठी अनुकूल राहील. उद्योग व्यवसायात धडाडीने काम कराल. अपेक्षित पत्रव्यवहार घडेल. नव्या व्यवहारात उत्तम प्रगती साधू शकाल. नोकरीतही कर्तृत्वाची साथ लाभेल. आपले कार्य कौशल्य कौतुकास्पद असेल. संततीची अभ्यासात प्रगती झालेली बघून समाधान वाटेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहकार्य लाभेल. सारख्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचा संभव आहे. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा सर्वस्व मार्गदर्शन मिळेल तसेच कुसंगत टाळावी. वैवाहिक सौख्यात कुरबुरी चालू राहतील. जोडीदाराच्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. खर्चामध्ये वाढ होईल

सामाजिक-धार्मिक क्षेत्रात रस

कर्क : काही वेळेस काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडतील आणि काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागतील. व्यवसाय-धंद्यासंबंधी काही समस्या असून त्या सोडवण्यासाठी आपण आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व आत्मविश्वासावर व परमेश्वरावर विश्वास ठेवून या परिस्थितीशी दोन हात करू शकता. यश आपलेच आहे मात्र धिम्यागतीने परिस्थितीत सुधारणा होऊन सफल व्हाल. कुटुंबातील धार्मिक कार्य आनंदाने पार पडेल. सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्या. मानव अधिकाराबाबत दक्ष राहा. भावंडे नातेवाईक यांचा सहवास व प्रेम मिळेल

यश मिळेल

सिंह : उद्योग-व्यवसायातील अडीअडचणींवर मार्ग काढण्यात यश मिळेल. मार्गदर्शन मिळेल. मदत मिळेल. शत्रूंवर विजय मिळवाल. उत्साही व हरहुन्नरी राहाल. जास्तीचे कष्ट घेण्याची तयारी असेल. नवीन आव्हाने स्वीकाराल. जिद्द व चिकाटीने मार्गक्रमण कराल. आपल्या कार्याची अथवा कार्यशैलीची प्रशंसा होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे श्रमही वाढणार आहेत. उत्पन्न वाढेल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढलेली दिसेल. नातेवाईक व भावंडांचे सौख्य लाभणार आहे. आपापसातील संबंध व नाती चांगली राहतील. लेखन कला छंद यामधून उत्तम यश मिळवता येईल.

विविध प्रकारची खरेदी होईल

कन्या : कुटुंबात शुभकार्य होण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सूचनांचा आदर कराल. विविध प्रकारची खरेदी होईल. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. विविध वस्त्रालंकार यासाठी खर्च होईल. सर्वांच्या मागण्या पूर्ण कराल. खर्च वाढला असला तरी विविध मार्गांतून धन आगमन होईल. हे दिवस आपणासाठी चैतन्याने भरलेले असतील. आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळू शकतील. विरुद्धलिंगी व्यक्तीला आपणाविषयी आकर्षण वाटू शकते.

संपूर्ण सहकार्य मिळेल

तूळ : या दिवसांत काही दिवस आपणासाठी सुखकारक असणार आहे. आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण चांगले दिसावे यासाठी आपण प्रयत्नशील राहाल, त्यासाठी उपाययोजना कराल. अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरातील काही व्यक्तींच्या वागण्याने आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. त्या व्यक्तीशी बोलून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. नवीन उपक्रम, उद्योग हे आकर्षक आणि योग्य फायदा मिळण्यासाठी आशादायी असतील. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळणार आहे.

सुवार्ता समजतील

वृश्चिक : कुटुंब परिवारातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर सुवार्ता समजतील. त्यांची अभ्यास व खेळ क्षेत्रात चांगली प्रगती होईल. शिक्षण नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळून उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. त्या कामी गुरुजन तसेच इतरांची मदत मिळू शकते. कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्य होऊ शकते. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील. नोकरी-व्यवसाय धंद्यानिमित्त मोठे प्रवास घडू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर सत्कार होईल. आर्थिक समस्या कुशलतेने हाताळाल

विविध मार्गांनी धनलाभ होतील

धनु : आर्थिक स्थिती मजबूत राहील. विविध मार्गांनी धनलाभ होतील. मालमत्तेची कामे फायद्यात राहतील. आर्थिक लाभ संभवतो. व्यवसायात महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. नवीन करार होऊ शकतात. जुनी येणी वसूल होतील मात्र वाद-विवाद सांभाळा. थोडी काळजी घेणे आवश्यक राहील. कुटुंब परिवारात वातावरण चांगले राहील. जीवनसाथीची साथ मिळेल. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. नोकरीत बदलीची किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील तसेच स्थानांतराचे योग आहेत. काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील.

प्रवासाचे योग आहेत

मकर : नोकरी, व्यवसाय-धंदानिमित्त जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर ती नियंत्रण आवश्यक राहील तसेच आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा तसेच आपले वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवा. वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण हवे भावंडांच्या भेटीगाठी होऊ शकतील. मुलांकडून अपेक्षा भंग होण्याची शक्यता. आपण शांतपणे निर्णय घेऊन वेळ पडल्यास मुलांशी चर्चा करून समस्या सोडवू शकाल. मुलांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास टाळा. आर्थिक फायदे होतील. जमीन जुमला तसेच स्थावर संपत्ती याविषयीचे थांबलेले व्यवहार गतीमान होतील.

समाधान लाभेल

कुंभ : कौटुंबिक सौख्यासाठी आपणास हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास आपणास खरे समाधान मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आपल्याला समाधान लाभेल आपल्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. कुटुंबात आपल्या मताला प्राधान्य दिले जाईल. नोकरी-व्यवसायात याअगोदर केलेल्या कामाचे फळ मिळेल. पदोन्नती वेतन वृद्धिचे योग आहेत. मात्र बदलीची तयारी ठेवा. वरिष्ठ आपल्या कामावर खूश राहतील. एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय धंद्यातील दीर्घकाळ रखडलेली रक्कम वसूल होईल

उद्योग-व्यवसायात यश

मीन : आताचा काळ आपणास अत्यंत समृद्धीचा काळ असणार आहे. आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचणी येऊ शकत नाही. कुटुंबाकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. तुमची प्रगती निश्चित आहे. उद्योग व्यवसाय आपणास यश मिळणार आहे. नोकरीमध्ये पण आपणास अनुकूल कालावधी आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीत सखोल विचार करणे आवश्यक आहे. अचानक प्रवासाची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. आपण काही भौतिक सुखाच्या वस्तू खरेदी कराल. एखाद वेळेस जमीन आणि यंत्रांची खरेदी होऊ शकते.
Comments
Add Comment