Monday, March 16, 2026

अभिनेत्री दिपिका कक्कड भावूक, आरोग्याविषयी व्यक्त केली चिंता

अभिनेत्री दिपिका कक्कड भावूक, आरोग्याविषयी व्यक्त केली चिंता

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड हिला २०२५ मध्ये आपल्याला कॅन्सर असल्याचे समजले. नुकताच यासंबधित तीची एक सर्जरी पार पाडली आहे.

दरम्यान अभिनेत्री दीपिकाआणि पति शोएब इब्राहिम सोशल मिडियावर सक्रिय असून ते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दीपिकाच्या फॅन्सना तिच्या आरोग्याबाबत माहिती देत असतात.

नुकताच आपल्या एका ब्लॉगमध्ये दीपिकानं तिच्या आरोग्याबाबतची माहिती फॅन्ससोबत शेअर केली आहे. यावेळी तिने सांगितलं आहे की या आजारामुळे तिला भूख लागत नाही. तसेच, यावेळी ती योग्य तो आहार घेत असून या आजारामुळे तिला सतत थकवा जाणवत आहे. या आजारामुळे तिला मानसिक ताण येत असल्याचं सांगत दिपिका भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

दिपिकानं तिच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत या ब्लॉगमध्ये बोलताना पुढे सगळं व्यवस्थित होवो अशी आशा दीपिकानं व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >