 |
इच्छा पूर्ण होतील
मेष : मागील काही काळ जाणवणारी आर्थिक ओढाताण संपुष्टात येईल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात आर्थिक फायदा चांगला होऊन बरेच दिवस मनात घोळत असलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. नोकरीत वेतन वृद्धी, पदोन्नती संभवते. कामाच्या स्वरूपातील बदलाचे व नवीन जबाबदाऱ्यांचे स्वागत करा. नवीन आव्हाने स्वीकारा त्यामुळे कर्तृत्वास नवीन झळाळी मिळेल. आत्मविश्वासात भर पडून पुढील कार्य करण्यासाठी कार्यमग्न राहा. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा करून देतील. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हिताचे ठरेल. कुसंगतीमुळे त्रास होऊन नुकसानीचे भय. असंगाशी संग नको. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घेणे आवश्यक
|
 |
रखडलेले व्यवहार गतीमान होतील
वृषभ : व्यवसाय-धंद्यावर सरकारी धोरणांचा सम-विषम परिणाम होण्याची शक्यता. नोकरीत सहकारी, वरिष्ठांबरोबर मत-मतांतरे होऊ शकतात. वाद- विवाद घडू नये यासाठी विविध प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या मतास उचित प्राधान्य द्या. एकूण सर्वच क्षेत्रांतील कार्य हातावेगळी करू शकाल. नोकरी-व्यवसायात कायदेशीर बाबी सांभाळल्या पाहिजेत. महत्त्वाची कार्य पूर्ण करू शकाल. जमीन-जुमला, स्थावर मिळकत याविषयीचे थांबलेले अथवा रखडलेले व्यवहार गतीमान होतील. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. घरातील मौल्यवान वस्तू कडे लक्ष ठेवा.
|
 |
यश व प्रसिद्धी मिळेल
मिथुन : अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे उत्साही व आनंदी राहाल. थोड्या प्रयत्नांनी हातात घेतलेली कामे पूर्ण होण्याचा अनुभव घेताना आश्चर्य वाटेल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह होतील. प्रेमात यश. व्यवसाय-नोकरीत एखाद्या स्त्रीपासून फायदा होऊ शकतो. व्यावसायिक नवे करार-मदार होऊ शकतात. विशेषतः परदेशी व्यापार वृद्धी योग, त्याचप्रमाणे परदेशगमनाचे योग. कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या विद्या अभ्यासातील प्रगतीच्या बातम्या मिळाल्यामुळे आनंदी राहाल. नवपरिणितांना अपत्य योग. व्यवसायामध्ये प्रतिष्ठा वाढेल.
|
 |
तडजोड फायद्याची ठरेल
कर्क : सध्याच्या कालावधीमध्ये अति महत्वकांशा न बाळगता वाटचाल करणे फायदेशीर ठरणार आहे तडजोड फायद्याची ठरेल कुटुंब परिवारामध्ये अथवा मित्रमंडळींच्या वर्तुळात छोट्या छोट्या कारणांवरू न वादविवादाची शक्यता नाती दुरावण्याची शक्यता वाद विवाद टाळून ना त्यांना महत्त्व देणे फायद्याचे ठरेल नोकरीत अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागण्याची शक्यता स्वतःच्या बोलण्यावर तसेच वर्तणुकीवर नियंत्रण आवश्यक भांडण टाळा व्यवसाय धंद्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल नोकरीत बदलीची शक्यता काही वेळेस मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागण्याची तयारी ठेवा कोर्ट प्रकरणातून मनस्ताप उद्भवू शकतो आपले प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे राहील प्रयत्न सफल होतील जुनी नोकरी सोडण्याचा विचार स्थगित करणे हिताचे ठरेल.
|
 |
भरघोस फळे मिळतील
सिंह : विशेषतः तरुण-तरुणींना भरघोस फळे मिळतील आपले शिक्षण पूर्ण करून जे जातक नोकरीच्या शोधार्थ असतील अशा जातकांचा नोकरी विषयक शोध संपुष्टात येऊ शकतो चालू नोकरीतही चांगली फळे मिळतील पदोन्नती वेतन वृद्धि सारख्या घटना घटित होतील मात्र बदलीची शक्यता व्यावसायिक आघाडीवर ती संपादित करा व्यवसायिक परिस्थिती सुधारेल कर्जातून मुक्तता व्यवसायातील नियोजन सफल होईल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची संधी शिष्यवृत्तीसह मिळू शकते मात्र भागीदारी व्यवसाय असल्यास भागीदार बरोबर येण्याचा संभोग वाद-विवाद टाळा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकाल आत्मविश्वास वाढल्यामुळे आपल्या समोरील कार्य झपाट्याने पूर्ण कराल जमीन स्थावर मिळकतीच्या व्यवहाराला चालना मिळेल
|
 |
गौरवास्पद कामगिरी
कन्या : आपण पूर्वी केलेल्या कार्याचा गौरव होऊन आपणास त्याची बक्षिसी मिळेल व्यक्तिगत फायदा होऊन मानसन्मानस पात्र ठराल. नोकरीत अचानक एखादी चांगली घटना आपला उत्साह वाढवेल पदोन्नती वेतन वृद्धीचे योग संभवतात आत्मविश्वासाने पुढील कार्य पार पाडाल आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडेल मात्र गोड बोलून आपला कार्यभाग साधा आपल्या वागण्याने अथवा बोलण्याने इतरांना दुखवू नका नात्यांना जपा कलाकार खेळाडूंना सरकार दरबारी मान मिळू शकतो आपल्या गुणांना वाव मिळून कौतुक होईल व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील कुटुंबात जरा सबुरीने घेण्याची आवश्यकता आहे आपली मते इतरांना पटतीलच असे नाही चांगल्या नात्यात अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु भावंडांची प्रगती आणि उत्कर्ष होईल तसेच कुटुंब परिवारात शुभ घटना घटित होतील शुभवार्ता मिळतील सहकुटुंब सहपरिवार तीर्थयात्रे निमित्त प्रवास करू शकाल.
|
 |
जुनी येणी वसूल होतील
तूळ : सुरुवातीला खर्चात वाढ झाल्यासारखे वाटेल त्यात काही अनपेक्षित खर्च ही समाविष्ट असण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढू शकतात तसेच मुला-मुलींच्या साठी खर्च संभवतो त्यांच्या शैक्षणिक बाबी खर्चीक ठरतील राहत्या घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता खर्च करावा लागेल एखादी नवीन खरेदी होईल तर घरगुती खर्च संबोधतात त्याप्रमाणे वाहनाच्या देखभालीवर खर्च करावा लागेल परंतु खर्चाच्या बाबी आपण सण करू शकाल कारण आपला आर्थिक स्त्रोतही वाढेल व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील उधारी उसनवारी वसूल होईल कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या बाबत समस्या उद्भवू शकतात त्यांचे प्रश्न सतावू शकतील कुटुंबातील वडिलांच्या बरोबर वाद-विवाद टाळा मतभेदाची शक्यता नोकरीत शांत राहण्याची आवश्यकता वरिष्ठांच्या मतास प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल प्रवास घडतील.
|
 |
मदत मिळेल
वृश्चिक : शुभ ग्रहांचे पाठबळ लाभल्यामुळे आर्थिक आलेख उंचावलेला अनुभवाल नोकरी व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील नेहमीच्या उत्पन्नांच्या मार्गा व्यतिरिक्त इतर मार्गांनी उत्पन्नात भर पडू शकते सरकारी क्षेत्रातून मदत मिळू शकते सरकारी अनुदानातून लाभ मिळू शकतो सरकारदरबारी जर एखादी प्रकरण प्रविष्ट असेल तर त्या प्रकरणी यश मिळेल तसेच आर्थिक सहाय्य मिळू शकते व्यवसायिक कर्ज मंजूर होतील ओळख यांच्या माध्यमातून मदत मिळेल मात्र असंगाशी संग ठेवणे महागात पडेल.तसेच अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील दुखापतीचे भय नोकरी-व्यवसायात पत प्रतिष्ठा वधारेल वैयक्तिक मानसन्मान मिळू शकतो केलेल्या कार्याचा गौरव होऊन कौतुकास पात्र ठरला नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील
|
 |
भाग्योदय
धनु : काही प्रमाणात कडू तसेच गोड फळे चाखण्यास मिळतील तरुण-तरुणींचा भाग्योदय नोकरी विषयक प्रश्न संपुष्टात येतील प्रयत्न विशेष सफल होतील त्याच प्रमाणे ओळखीमध्ये तिथून कामे पार पडू शकतात कुटुंबात अथवा बाहेरील क्षेत्रात वादविवाद टाळा. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील व्यवसायिक वादग्रस्त येणी आल्यामुळे आश्चर्य वाटेल. विवाह जमतील अपवादात्मक विवाहयोग. सरकार दरबारची प्रलंबित अवस्थेतील कार्य गतिमान होऊन पूर्णत्वाकडे झुकते कलाकार साहित्य क्षेत्रातील मंडळींना अनुकूल कालावधी प्रसिद्धी संभवते तसेच मानधनात वाढ होऊन नवीन कार्य हाती घ्यालजवळच्या व्यक्तींच्या विचित्र वागणुकीमुळे मनस्तापाची चिन्हे पण आपण लगेचच टोकाची भूमिका घेण्याचे टाळा पूर्ण विचारांती शांतपणे निर्णय घ्या लहान मोठे आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल गर्भवती महिलांनी स्वतःची जास्त काळजी घ्यावी.
|
 |
प्रवास घडतील
मकर : जवळच्या व्यक्ती मातृत्वाच्या भावनेने आपल्याशी वागण्याची शक्यता आहे समज-गैरसमज होण्याची शक्यता. कोणीही काहीही आरोप केल्यास शांततेने घ्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी हे आवश्यक ठरणार आहे संबंधित स्त्रियांशी सौजन्यपूर्ण वागणूक आवश्यक आहे प्रतिष्ठेचे विषयक समस्या निर्माण होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती जपा कोणाच्या आजारपणाचा अथवा शस्त्रक्रियेचे योग आहेत मानसिक व शारीरिक त्रासाची शक्यता उत्तरार्धात काहीसे प्रतिकूल वाटणारे ग्रहमान बदलेल काही चांगल्या शुभ घटना घट झाल्यामुळे मानसिकता सुधारेल दिलासा मिळेल व्यवसायातील तसेच नोकरीत धंद्यातील परिस्थिती मध्ये फारसा बदल अपेक्षित नाही व्यवसायानिमित्त प्रवास घडतील प्रवास सफल होतील कुटुंबातील विद्यार्थी वरदान कडून अपेक्षित वाढता मिळतील अडलेली कामे मार्गी लावण्यात यश मिळेल उद्योग-व्यवसायात यश मिळेल परंतु आळसाला दूर सारणे हितकारक ठरेल
|
 |
धनलाभाचे योग
कुंभ : अनुकूल परिस्थिती असली तरी सध्याच्या परिस्थितीचे शांतपणे अवलोकन करून मगच निर्णय घ्यावे लागतील आर्थिक आवक जरी येत राहिली तरी खर्चाचे प्रमाण आणि वाढलेले अनुभवास येऊ शकेल कुटुंब परिवारासाठी काही खर्च अपरिहार्य तर काही खर्च अचानक समोर उभे राहिल्यामुळे त्याची पूर्तता करावी लागेल व्यवसायातील उलाढाल वाढलेली दिसून येईल.धनलाभाचे योग आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे कारण मानवी उपद्रव संभवतो अपरिचित अपरिचित व्यक्तींबरोबर वागवत टाळावेत कलाकारांना अनुकूल कालावधी केलेल्या कामाचा गौरव होऊन मानसन्मान मिळेल नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होईल खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी मिळतील तसेच गुणांना वाव मिळेल सरकारी नोकरीतील जातकांना बदली सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे .
|
 |
व्यावसायिक लाभ
मीन : व्यवसायात अधिक लाभ संभवतात व्यवसायिक परिस्थिती समाधान कारक राहून उलाढाली मध्ये वृद्धि होईल जुन्या सहकार यांच्यासमवेत व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल भागीदारी व्यवसायात भागीदाराच्या बरोबर वाद-विवाद मतभेद नको. कुटुंब परिवारामध्ये विरोध वाढू शकतो राजकारणात सक्रिय असलेल्या जातकांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे आश्चर्यकारकरित्या जवळचे लोक शत्रुत्व वागू शकतात येथे शत्रूंच्या कारवाया कडे नीट लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल विरोधकांच्या विरोधाला नवी धार चढल्याचीजाणीव होईल.काही व्यक्तींच्या गाठीभेटी मनस्ताप वाढवू सत्ता एखाद्या अनामिक भीतीचा पगडा मनावर राहू शकतो तरुण-तरुणींनी शक्यतो सावधगिरी बाळगावी आपण चुकीचे वागत नाही ना याची वेळोवेळी स्वतः नोंद घेणे आवश्यक आहे |