धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा केल्यास भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच, जीवनातील अडथळे दूर होतात. हिंदू पंचांगानुसार, वर्षात एकूण २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहे. यंदा मार्च २०२६ मध्ये पापमोचनी एकादशी आणि कामदा एकादशी या दोन महत्त्वाच्या एकादशी आहेत.
कामदा एकादशी २९ मार्च २०२६ रोजी साजरी केली जाणार असून धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी काही शुभ योग देखील तयार होत आहेत, त्यामुळे या पूजेचे आणि व्रताचे फार महत्त्व आहे.
एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर भगवान विष्णूंची मनोभावे पूजा अर्चना करावी. या दिवशी विष्णू मंत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करणे शुभ मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार एकादशीचे व्रत मनोभावे केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते.






