Monday, March 2, 2026

US fighter jet : अमेरिकेचं लढाऊ विमान कुवेतमध्ये कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल

US fighter jet : अमेरिकेचं लढाऊ विमान कुवेतमध्ये कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल

सोमवार २ मार्च २०२६ रोजी कुवेतमध्ये अमेरिकेचे एफ-१५ (F-15) लढाऊ विमान कोसळल्याचा आणि आगीच्या गोळ्यात रूपांतर झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिड-ईस्ट मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असूनपायलट सुरक्षितपणे बाहेर पडल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. विमानाचा ढिगारा मीना अल-अहमदी रिफायनरी परिसरात पडल्याने दोन कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याचे सांगण्यात आले असून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. कुवेतमधील पश्चिम भागात हे विमान कोसळले असून या घटनेनंतर आता अमेरिकन किंवा कुवेती प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्याची प्रतीक्षा आहे. मात्र सध्या संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विमान कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

F-15 ईगल बद्दल :

F-15 ईगल हे अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख हवाई श्रेष्ठता लढाऊ विमान राहिले असून त्याने २०२६ पर्यंत १०४-० असा परिपूर्ण लढाऊ विक्रम कायम ठेवला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा