मुंबई : बीसीसीआयने सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रमुख खेळाडूंसाठी २०२५ - २६ च्या हंगामाचा नवा करार जाहीर केला. या करारानुसार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना आता ब श्रेणीचे (बी ग्रेड) खेळाडू ठरवण्यात आले आहे. या हंगामात ए+ श्रेणीचा करार टाळण्यात आला आहे. कोणत्याही खेळाडूचा समावेश ए+ या श्रेणीत केलेला नाही.
एकूण ३० खेळाडूंसोबत २०२५ - २६ च्या हंगामासाठी करार करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार खेळाडूंसाठी आता फक्त ए, बी आणि सी अशा तीन ग्रेड अर्थात अ, ब, क अशा तीन श्रेणी असतील. शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह आता ए ग्रेड अर्थात अ श्रेणीत असतील.
विराट कोहली, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर हे ११ खेळाडू बी ग्रेड अर्थात ब श्रेणीत असतील.
अक्षर पटेल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवी बिश्नोई, ऋतुराज गायकवाड हे १६ खेळाडू सी ग्रेड अर्थात क श्रेणीत असतील.
सी ग्रेड अर्थात क श्रेणीत साई सुदर्शन या नव्या खेळाडूचा समावेश झाला आहे. बीसीसीआयच्या करारातून मोहम्मद शमी, ईशान किशन, रजत पाटीदार, मुकेश कुमार, सर्फराझ खान यांना यावेळी वगळण्यात आले आहे.







