लंडन : विद्यमान विजेता जॅनिक सिनरने (Jannik Sinner) विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टेनिसचा महान खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच (Novak Djokovic) याचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. जगातील अव्वल मानांकित सिनरने सात वेळच्या विम्बल्डन विजेत्या जोकोव्हिचला ६-४, ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.
आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात सिनरचा सामना दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. झ्वेरेव्हने दुसऱ्या उपांत्य फेरीत ब्रिटनच्या वाइल्ड कार्ड खेळाडू आर्थर फेरीचा ७-६ (७-०), ६-२, ६-४ असा पराभव करत प्रथमच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Wimbledon 2026)
अथेन्स : ग्रीसमधून (Greece) जर्मनीकडे (Germany) जाणाऱ्या रायनएअर (Ryanair) या प्रवासी विमानात (Passenger Plane) ३० हजार फूट उंचीवर अत्यंत धक्कादायक घटना घडली. उड्डाणादरम्यान (Flight) ...
फ्रेंच ओपनमध्ये पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलेल्या झ्वेरेव्हसमोर आता सलग दुसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. व्यावसायिक टेनिसच्या इतिहासात (१९६८ नंतर) पहिले ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर लगेचच पुढील ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू बनण्याचे लक्ष्य त्याच्यासमोर आहे. (Wimbledon 2026)
मात्र, आकडेवारी सिनरच्या बाजूने आहे. सिनरने झ्वेरेव्हविरुद्धचे सलग नऊ सामने जिंकले असून, त्यांच्या शेवटच्या १४ सेटमध्येही सिनरनेच विजय मिळवला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत सिनरला किंचित वरचष्मा मानला जात आहे. (Wimbledon 2026)
इंग्लवुड, कॅलिफोर्निया (एपी): स्पेनचा अष्टपैलू खेळाडू मिकेल मेरिनो पुन्हा एकदा विश्वचषकाचा हिरो ठरला आहे. शुक्रवारी झालेल्या विश्वचषक फुटबॉल ...
दुसरीकडे, ३९ वर्षीय नोव्हाक जोकोव्हिचसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे त्यांचे स्वप्न यंदाही अपूर्ण राहिले. आता सर्वांचे लक्ष रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले असून, विद्यमान विजेता जॅनिक सिनर आपले जेतेपद कायम राखणार की झ्वेरेव्ह सलग दुसरे ग्रँडस्लॅम जिंकत इतिहास रचणार, याची उत्सुकता टेनिसप्रेमींमध्ये शिगेला पोहोचली आहे. (Wimbledon 2026)





