Friday, January 30, 2026

शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन

शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देत पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे राजकारणापलीकडचे, आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे होते. जे शब्दांत मांडणे अशक्य आहे. स्व. अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते, तर दिवसरात्र जनतेसाठी झटणारे, कामातून आपली ओळख निर्माण करणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांसह आम्हा सर्वांसाठी निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, अशी शोकप्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त करत या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी पवार कुटुंबीयांना धीर दिला. ईश्वर स्व. अजितदादांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना आमदार निलेश राणे यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा