Sunday, January 25, 2026

रविवारी तिन्ही मार्गांवर मोठा ब्लॉक

रविवारी तिन्ही मार्गांवर मोठा ब्लॉक
मुंबई : आज आणि उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून लोकल सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेतला जात असून, या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार, तर काही सेवा उशिराने धावणार. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद स.११.०५ ते दुपारी ३.४५ या कालावधीत जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल रद्द होणार असून काही फेऱ्या वेळापत्रकापेक्षा उशिरा येतील. हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन स. ११.४० ते दु. ४४० सीएसएमटी-वाशी, सीएसएमटी-बेलापूर, सीएसएमटी-पनवेल तसेच सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते गोरेगाव स.१० ते दु. ३ तसेच पश्चिम रेल्वे (हार्बर मार्ग) ब्लॉकब्लॉकचा भाग माहीम ते अंधेरी अप आणि डाउन स.११ ते दु. ४ या वेळेत चर्चगेट-गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे तसेच हार्बर मार्गावरील अनेक अप-डाउन लोकल सेवा रद्द राहणार आहेत. आज आणि उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून लोकल सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेतला जात असून, या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार, तर काही सेवा उशिराने धावणार. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद स.११.०५ ते दुपारी ३.४५ या कालावधीत जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल रद्द होणार असून काही फेऱ्या वेळापत्रकापेक्षा उशिरा येतील. हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन स. ११.४० ते दु. ४४० सीएसएमटी-वाशी, सीएसएमटी-बेलापूर, सीएसएमटी-पनवेल तसेच सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते गोरेगाव स.१० ते दु. ३ तसेच पश्चिम रेल्वे (हार्बर मार्ग) ब्लॉकब्लॉकचा भाग माहीम ते अंधेरी अप आणि डाउन स.११ ते दु. ४ या वेळेत चर्चगेट-गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे तसेच हार्बर मार्गावरील अनेक अप-डाउन लोकल सेवा रद्द राहणार आहेत.
Comments
Add Comment