नांदेड : महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुडखेड तालुक्यातील जवळा मोरार येथे नाताळच्या दिवशी लखे कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह आढळले होते. रमेश लाखे (५१) आणि त्यांची पत्नी राधा लाखे (४५) यांचे मृतदेह घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळले होते तर २५ वर्षीय उमेश लाखे आणि त्याचा २३ वर्षीय भाऊ बजरंग ल३खे या दोघांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानकाजवळ रुळावर छिन्नविछिन्न स्थितीत आढळले होते. दोन्ही भावांनी रेल्वेखाली जीव दिल्याचे परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट दिसत होते. पण लाखे कुटुंबातील चौघांनी टोकाचे पाऊल का उचलले हे समजत नव्हते.
अखरे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करुन तपास सुरू केला. तपास केल्यावर मुलांनीच लाखे पतीपत्नीची अर्थात रमेश आणि राधिका लखे यांची हत्या केल्याचे आणि नंतर आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले. रमेश लखे २५ वर्षांपासून आजारी होते आणि घरातच होते. त्यांच्या उपचारांवर प्रचंड खर्च होत होता. य वाढत्या खर्चामुळे त्रासलेल्या उमेश आणि बजरंग यांनी आधी लखे पती पत्नीची अर्थात स्वतःच्या आईवडिलांची हत्या केली. नंतर आत्महत्या केली. पोलिसांनी या संदर्भात एक अहवाल न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती दिली आहे.
उमेश आणि बजरंग यांनी त्यांच्या पालकांची घरी झोपेत असताना गळा दाबून हत्या केली आणि नंतर चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. रमेश लाखेला अर्धांगवायू झाला होता त्याच्या उपाचारावरील खर्च करणे अशक्य झाले होते म्हणून आलेल्या नैराश्यातून उमेश आणि बजरंग लाखे यांनी धक्कादायक कृती केली. याआधी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. पण पोलीस तपासातून वास्तव समोर आले आहे. वास्तव समोर येताच अनेकांना धक्का बसला आहे.






Sai December 28, 2025 02:21 AM
समृद्ध महाराष्ट्रभूमीत कोवळ्या जीवांना असे करावे लागणे ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी घटना आहे. आपला शेजारीपाजारी, महाराष्ट्र: ह्यांच्याकरता मी काय करू शकतो?